घाण नाहींशी करणं म्हणजे विघातक काम आहे काय असेल तर तसलेच कार्य प्रथम पाहिजे. ज्या स्थितीत लोक समाधान मानीत होते, ती स्थिति खरी दुःखरूप आहे असे त्यांनी त्यांस पटविले. 'आजूबाजूस चोहोंकडे टोळधाड आली आहे; निजतां काय?' असा त्यांनी जोरानें व सर्वांस स्पष्ट ऐकू जाईल अशा घनगर्जनेने इशारा दिला. नकली व खोटी संतोषवृत्ति लोक जी उराशी बाळगत होते ती पार घालवून त्यांनी असंतोष निर्माण केला. संतोष असेल तर मनुष्य कांही एक करणार नाहीं. जो संतोष म्हणून मानण्यांत येतो तो वस्तुतः बेगडी संतोष होय. तुम्ही प्रेतास जीव म्हणून कवटाळीत आहां हे जेव्हां लोकांना आपण पटवून देऊ तेव्हां ते उठतील. नवीन उद्योगांस- अन्य कार्यांस प्रवृत्त होतील. 'असंतोषः श्रियो मूलम्'— गोखले जर सुशिक्षित लोकांस उद्योग करा, देशाची स्थिति पहा असे न सांगते तर सुशिक्षितांस कशासाठी प्रयत्न करावयाचा हेच कोडे पडलें असतें. शिवाय सरकारजवळ सनदशीरपणाने हक्क मागण्यासाठी सर्व जनतेचा आपणास पाठिंबा पाहिजे. मवाळांचे किंवा नेमस्तांचे चुकते ते येथेच ते चार सुशिक्षितांस उपदेश करितील; व्याख्याने देतील; नाहीं तर विलायतेत मुत्सद्यांच्या यांच्या मांडीशी मांडी लावण्याची लग्नघाई करतील. परंतु देशांतील किती लोक स्वराज्य मागत आहेत असा प्रश्न जर प्रतिपक्षाकडून आला तर मूठभर सुशिक्षित लोक हें उत्तर देणे भाग पडते. म्हणून मुत्सद्द्यांबरोबर वाटाघाट करण्याऐवजी आधी जनतेचा चित्तक्षोभ केला पाहिजे. जनतेस जे शिकवावयाचें तें नाना युक्त्यांनी शिकविले पाहिजे. त्यांच्यांत ऐक्य, संघटना व्हावी; त्यांच्यांत राष्ट्रप्रेमाचे स्फुरण उत्पन्न व्हावें, तेज चढावे, यासाठी श्रीगणेशोत्सव, श्रीशिवाजी उत्सव, अशा चळवळी करणं टिळकांस भाग पडलें. ज्यांस साग्र वाचून देशाची स्थिति जाणतां येते त्यांच्यासाठी हे प्रयत्न नव्हते. तर खेड्यापाड्यांत राहणारे मावळे हेटकरी यांच्यासाठी हे प्रयत्न होते; कारण या लोकांना कांही तरी भव्य, भडक पाहिजे असतें. सर्व जनतेला शिकविण्यासाठी केसरी होता. केवळ नवीन विचारांच्या सुशिक्षितांस शिकविण्यासाठी नव्हता. आणि यामुळे टिळकांस सामाजिक बाबीत कांहीं लिहितां येत नसे. जनमनांत त्यांनी असंतोषाचें बीज पेरले हेंच त्याचें महत्त्वाचे देशकार्य होय. जो चिरोल साहेबांच्या मतें दोष तेंच
पान:ना. गोखले चरित्र.pdf/२५४
Appearance