मध्यंतरी सिमल्यास जाऊन त्यांस सभाबंदीच्या कायद्यास विरोध करावा लागला. १९०७ साल तर संपले. १९०८ साल उजाडलें. मार्च महिन्यांत ते कौन्सिलच्या कामाकरितां निघून गेले. अद्यापपर्यंत मोठे लष्कर ठेवण्यास रशियाची भीति हें कारण दाखविण्यांत येत असे. ती तर आतां निघून गेली होती. परंतु देशांत असंतोष माजला आहे, लोक नाना प्रकारच्या गोष्टी सांगताहेत, अशा वेळी सैन्य कमी करणे वेडेपणा आहे, असें आतां कांगावखोर व निमित्तावरच टेकलेल्या सरकारचें म्हणणें पडलें. यास गोखल्यांनी विरोध केला. शिक्षणाच्या बाबतीत सरकार अस्वलासारखें कसें सुस्त पडलें आहे, सरकारला अद्याप जाणीव कां होत नाहीं याचा खुलासा त्यांनी विचारला. संस्थानिकांनी सुद्धां आपआपल्या चिमुकल्या संस्थानांत शिक्षण सक्तीचे केलें आणि सरकारला लाजविले. परंतु सरकारास लाज असेल तर ना लाज वाटणार? इंग्लंडमधून येथे येतांना सर्व लाज 'समुद्रास्तृप्यन्तु' करून मग हे देव मुंबापुरीच्या किनाऱ्यावर उतरतात. त्याचप्रमाणे धंदेशिक्षण, कला- शिक्षण देण्यांत तर आमचे सरकार गोगलगाईच्या गतीने सुद्धां चालत नाहीं. तें स्थिर राहून पैसा कोठे आहे असें विचारते. गोखले म्हणत "My lord, I repeat the money is there or can be found without difficulty. Only the will has to be there and then we shall not be found merely discussing the difficulties of the problem." नंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या वाढत्या कर्जबाजारीपणास आळा घालण्याचे उपाय सुचविण्यास व ते ताबडतोब अंमलात आणण्यास सांगितले. सरतेशेवटी देशांतील वाढत्या संतापाकडे ते वळले. सर्व सुशिक्षित लोक हळूहळू निराश होत जाऊन ब्रिटिश राज्यांतील व्यवस्था त्यांस मरणप्राय वाटेल. 'But sooner or later, mere order in bound to appear irksome to those who zealously cultivate the belief that there is no chance of better days for their country as long as existing arrangements continue.' मोर्ले साहेबांस न साजेशा त्यांच्या अंदाजपत्रकावरील भाषणाचा निराशेने गोखल्यांनी उल्लेख केला. इंग्लिशांवरील भक्ति, श्रद्धा, निष्ठा यांस मूठमाती देण्यांत येत आहे; असे असतां ज्या कांही सुधारणा द्यावयाच्या असतील त्या त्वरित द्या. त्या उदारभावाने द्या. लोकांस असे वाटू द्या की, 'The people must be
पान:ना. गोखले चरित्र.pdf/२०२
Appearance