Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३

सामान्य जनसमूहाला ती दिसण्याचे प्रसंग तितके येत नसत. तथापि त्यांचा आत्मा देशाच्या भावी हितासाठी तळमळत असे आणि तोच त्यांस आंतून निरंतर जागवीत असे. ही देशप्रीतीची आग आंत नसती तर त्यांचे हातून झाला हा उद्योग झाला नसता. त्यांनी चटकन् सरकारी अधिकाऱ्यांची कृपा संपादून एखादी लठ्ठ पगाराची नोकरी मिळवून आणि वर मोठेपणाही मिरविण्याची एखादी युक्ति पसंत केली असती! पण
 आपल्या देशाची स्थिति अत्यंत वाईट झालेली आहे व या गोष्टीचा वेळींच जर लोकांनीं कांहीं बंदोबस्त केला नाहीं तर आमचा रोग दुःसाध्य होईल अशी कळकळ ज्यांना मनापासून वाटत आहे अशांमध्ये ना. गोखले यांची गणना केली पाहिजे, देशस्थितीसंबंधानें इतर कोणाला जितके वाईट वाटत असेल व कांहीं तरी उपाय योजणें जरूर आहे याविषयीं इतर कोणाला जितकी काळजी वाटत असेल तितकेंच वाईट ना. गोखले यांना वाटत असून देशाबद्दल तितकीच काळजी तेही वाहात आहेत. कळकळीच्या कमीजास्तपणामुळे नवीन पक्ष व ना. गोखले यांच्या राजकाणांत भेद उत्पन्न झालेला नाहीं. हा भेद स्वभावाचा व विचारसरणीचा आहे" (केसरी- अग्रलेख ता. १२ फेब्रुवारी १९०७).
 असले भिकार मोह त्यांनीं आपल्या शुद्ध आत्म्यास कधीही होऊ दिले नाहीत तर देशहिताची शुद्ध, पवित्र आणि थोर चिंताच रात्रंदिवस वाहिली म्हणूनच ते येवढ्या महत्पदाला चढले.
 येणेप्रमाणें गोपाळरावांचे आंगच्या अनेक गुणांपैकी निवडक सहा- गुणांचें स्वरूप व महत्व येथवर वर्णन केलें, त्याची ही षड्गुणैश्वर्यसंपन्नता पाहून गोपाळरावांचा कोणालाहि हेवा वाटेल आणि जर त्यांचें अनुकरण करण्याचे कोणी मनांत आणील तरच हे गुण गोपाळरावांनी वाढीव लावल्याचं चीज झालें असें म्हणतां येईल. रा. साने यांनीं गोपाळरावांच्या आंगचे हे गुण फार रसाळपणानें व कळकळीनें वर्णन केले आहेत व त्याचा ठसा आपले मनावर वाचक उठवून घेऊन कृतार्थ होतील अशी आशा आहे.
 नामदार गोखले यांचे गुण आपण वर्णिले परंतु त्यांच्या प्रत्यक्ष