Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/१७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४२
इंग्लंडच्या हितार्थ हिंदुस्तानच्या हिताचा बळी देऊं नका !

 या 'पायोनिअर'च्या पाणचट, चटोर व चारगट लिहिण्यास 'हिंदुस्तान रिव्ह्यू' नें थोडक्यांत पण मुद्देसूद उत्तर देऊन थप्पड लगाविली. 'हिंदुस्तान रिव्ह्यू' म्हणतो, 'But evidently Pioneer forgets that but for the splendid and deep loyalty of the princes and the people except perhaps in Oudh- as distinguished from the soldiers during the dark days of 1857, the map of India would have been differently coloured. It is well-known, although Pioneer chooses to forget it for the moment that the Mutiny of 1857 was not a national movement.' हिंदुस्तानांत राजपुत्र आला तो म्हणतो, 'We shall never forget the affectionate greetings of India and Burma.' जॉन ब्राइट म्हणत असे कीं, 'You may govern India if you like for the good of England, but the good of England must come through the channels of the good of India.' परंतु एकाद्यानें जरी असे उद्गार काढण्याचे नीति-धैर्य दाखविले तरी हिंदुस्तानवर जे अधिकारी येतात ते बहुधा हिंदुस्तानच्या हितास 'अब्रम्हण्यम्' समजणारेच असतात. इंग्लंडची तुंबडी भरली, गोऱ्यांचे गाल वर आले आणि लाल झाले कीं, पोटाची दामटी वळलेल्या हिंदुस्ताननें ढेकर दिलाच असे या बहादुरांना वाटतें! परमेश्वर हेंच चक्र उलटें फिरवील आणि याच चक्राला कधीं तरी उलटी कलाटणी मिळेल अशा विश्वासावर दृष्टि ठेवून अवनत राष्ट्रांनी पाय हलविले पाहिजेत. दुसरें काय?

भारत - सेवक समाज.


 या वर्षातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व्हंट ऑफ इंडिया सोसायटीच्या सभासदांचें प्रथम संमेलन- अधिवेशन पुणे येथें भरलें. ही संस्था- हा भारत सेवक समाज १९०५ साली जून महिन्यांत स्थापन करण्यांत आला होता. या वर्षी एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत सर्व सभासद जमले आणि नियम, घटना वगैरे सर्व ठरविण्यांत आलें. सर्व्हंट ऑफ