हें ग्लॅडस्टनचे सूत्र आहे. परंतु तुम्ही आधीं घरांत पोहावयास शिका म्हणजे मग आम्ही तुम्हांस सागरांत नेऊं अशा प्रकारचें आमच्या अधिकाऱ्यांचें म्हणणें असतें. हिंदुस्तानास दिलेल्या वचनांचा वेळोवेळी कसा भंग केला गेला हे जगजाहीरच आहे. गोड गोड थापा मारून वेळ मारून नेणें हें सरकारचें काम आणि तें त्यानें यथायोग्य केलें, नोकरशाही लोकांत मिसळण्यास पुढे येत नाहीं; लोकांनीं भीत भीत, नमून त्यांच्या पुढे वागले पाहिजे, अशी स्थिति आली आहे. ही स्थिति पालटली पाहिजे. आपणांस ताबडतोब कांहीं तरी हक्क मिळाले पाहिजेत. ते कोणचे असावेत या गोष्टीचेही त्यांनी स्पष्टीकरण केलें, जिल्हा-बोर्डांची त्यांनी फार जरुरी दाखविली. हिंदुस्तानचा बराचसा राज्यकारभार डिस्ट्रिक्ट अधिकाऱ्यांकडून हांकला जातो. त्यांस सल्ला देण्यास आणि पुढें त्यांच्यावर ताबा ठेवण्यास या जिल्हाबोर्डांचा फार उपयोग होईल असे रानड्यांस वाटत असे. ही महत्त्वाची सुधारणा गोपाळरावांनी लोकांपुढे मांडली. इंग्लंडमधील परिस्थितिही आपणांस अनुकूल आहे; स्टेट सेक्रेटरी, अंडर सेक्रेटरी हिंदुस्तानच्या भवितव्यतेविषयीं उदार धोरण बाळगणारे आहेत असें त्यांनी दाखविलें, विशेषतः मोर्ले साहेबांविषयीं गोखल्यांनी फारच आदर दाखविला. पण पुष्कळदां या जगांत जसें दिसतें तसें नसतें. मोर्ले तत्त्वज्ञ असले, राज्यकारभार बराचसा लोकांच्या हातांत पाहिजे असें बर्कच्या अध्ययनानें, व ग्लॅडस्टनच्या शिकवणुकीनें जरी त्यांचें मत बनले असले, तरी सेक्रेटरीच्या जागेवर येतांच, या जागेला चिकटलेले संकुचितपणा, मतकृपणता, अनुदारता हे दुर्गुण त्यांना येऊन चिकटले. हे दुर्गुण दूर लोटण्याचे त्यांस सामर्थ्य नव्हतें. बदललेल्या परिस्थितींत जो आपले स्वतःचे उदार विचार कायम ठेवून तदनुरूप कृति करण्याची खटपट करितो तोच महापुरुष होय. मोर्ले अर्थात् या कोटींतले नव्हते. ते पुस्तकी पंडित होते. त्यांना वांगी फक्त पुराणाचे वेळीं निषिद्ध होतीं. परंतु गोखले भोळे! त्यांना मोर्ले साहेबांविषयी फार आशा वाटत होती. आपल्या देशास हा कांहीं तरी भरभक्कम सुधारणा देईल असे गोपाळरावांस वाटत होते. त्यांचे हृदय खालींवर होत होतें:-
"And as regards the new Secretary of State for India, what
पान:ना. गोखले चरित्र.pdf/१४८
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११६
मोर्ल्यांसंबंधीं गोखल्यांस वाटत असलेली फाजील आशा.