अध्यक्ष याच वर्षी निवडल्यामुळे मुंबईस जाण्याचा बेत कायमचा मागें पडला.
या वेळेस हिंदुस्तानची सूत्रे लॉर्ड कर्झन साहेबांच्या हातांत होती. एका लेखकानें असें म्हटलें आहे कीं, जर लॉर्ड कर्झनमध्ये आहे त्याच्यापेक्षां कमी घमेंड असती तर ते फारच मोठे गृहस्थ झाले असते. मोठेपणाबरोबर थोरपणाही त्यांच्यामध्यें आहे असें जगास दिसलें असतें. हिंदुस्तानच्या व्हाइसरॉयपदावर केव्हां ना केव्हां तरी अधिष्ठित होईन अशी महत्त्वाकांक्षा बालपणापासून त्यांनीं धरिलेली. ती महत्त्वाकांक्षा सफल झाली होती. लहानपणचे मनोहर मनोरे खरोखरच उभारले गेले. कर्झनसाहेबांस धन्य वाटले असेल, तेहतीस कोटि लोकांचा मी अधिकारी, अनेक संस्थानिक माझ्याशी रुंझी घालावयास तयार हा वैभवशाली देखावा पाहून त्यांना आवेश चढला. मोठमोठे बेत त्यांनी केले होते. निरनिराळे बारा सुधारणाप्रकार त्यांनी जाहीर केले होते. हळूहळू ते पोटांतून बाहेर येत होते. आपण म्हणूं तें करूं आणि जे करूं तें शहाणपणाचें, दुसऱ्यास त्यांत सुधारणा सुचविण्याची किंवा ढवळाढवळ करण्याची योग्यता अगर अक्कल मुळींच नाहीं असें त्यांस स्वाभाविक वाटत असे आणि जें कांहीं करावयाचें तें सर्व देशांत व्यवस्था राहावी, घडी उसकटू नये म्हणून अशी त्यांची समजूत होती.
अशा या अनाठायीं बाणेदारपणा बाळगणाऱ्या गृहस्थासमोर गोखल्यांस जावयाचे होते. कर्झनसाहेबांस 'आजपर्यंतच्या सर्व गव्हर्नर जनरलांमध्ये आपण वयाने लहान' आहों असा अभिमान वाटे. त्यांचें वय फक्त ४३ वर्षांचें होतें! गोखल्यांचे वयही फार नव्हतें. ते ३६ वर्षांचे म्हणजे कर्झनसाहेबांपेक्षां सात वर्षांनी लहान होते. कर्झन साहेबांत तडफदारपणा व तरतरीतपणा होता; आणि गोखल्यांच्या तोंडावरही विद्वत्तेचें तेज चमकत असे, पाणीदारपणा एकवटलेला दिसे. कर्झन अरेराव व ताठेबाज; तर गोखले मनमिळाऊ, नेमस्त परंतु योग्य प्रसंगीं भीड- भाड न ठेवणारे. कर्झनसाहेबांस एतद्देशीय म्हणजे गोऱ्यांच्या पदकमलावार रुंझी घालणारा असे वाटे; तर गोखले हे खरे भारतसेवक, आपल्या
पान:ना. गोखले चरित्र.pdf/११८
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८६
गोखले व कर्झन.