पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/11

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 दुसऱ्या नव्या, सुधारित आवृत्तीत, रचनात्मक बदल करण्यात आला आहे. पहिल्या आवृत्तीत 'नवे शिक्षण' आणि 'नवे शिक्षक' असे दोन भाग स्वतंत्र होते. ते यात एक करण्यात आले आहेत. अनुक्रमणिका एकत्र दिल्याने समग्र पुस्तक एका कटाक्षात विषयाच्या अनुषंगाने वाचकास समजणे सोपे झाले व त्यातून समग्र पुस्तक वाचले जाईल अशी व्यवस्था झाली आहे. पूर्वप्रसिद्धी सूचीचेही एकत्रीकरण केले आहे. 'शिक्षकाचा आत्मस्वर आणि ऊर्जा' शीर्षक 'नवे शिक्षक' मधील मूळ लेख हे एका शिक्षक शिबिरातील माझे भाषण होते. ते पुनर्लेखन करून लेख रूपात छापले आहे. याचा पूर्वप्रसिद्ध मसुदा सदोष होता, म्हणून ही सुधारणा करण्यात आली आहे. शिवाय 'नवा शिक्षक' कवितेचा मूळ क्रमही बदलला आहे. या सर्व सुधारणा आणि बदलामुळे ही आवृत्ती वाचक सुलभ झाली आहे. या कामी अक्षर दालन प्रकाशनचे अमेय जोशी यांचे आभार. वरील सर्वांचे ऋण व्यक्त करून 'दोन शब्दां'ना विराम! या पुस्तकाची कन्नड आवृत्ती लवकरच प्रकाशित होत आहे.

- डॉ. सुनीलकुमार लवटे

२७ फेब्रुवारी, २०१७
मराठी भाषा दिन