पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

इतिहासजमाच झाले आहे. त्यांना शिकवायचे ते टंकन (Typing). टायपिंग आले माउस, सिलेक्ट, क्लिक, कट, पेस्ट, फॉर्वर्ड, सेंड, डिलीट, प्लस, मायनस, इन टू, डिव्हायडेड बाय, सेट, कलर, ऍनिमल, बर्डस्, प्लँटस्, ऱ्हाईम्स, साँग्ज थोडे-थोडे शिकवत राहायचे. मल्टिमिडिया, टी.व्ही., फिल्म, स्लाइडस्, डी.व्ही.डी, एम.पी.थ्री., मॉनिटर्स, इंटरनेट असले की झाले. बाई, आया, लाकडी घोडा, तक्ते, ठोकळे, सापशिडी, गलोरी, बाहुलीची बालवाडी मागच्या शतकाबरोबरच संपली खरे तर !
 एकदा तुम्ही डिजिटल किंडरगार्टन सुरू केली की डिजिटल प्रायमरी स्कूल सुरू करणे सोपे. डिजिटल क्लास, थ्रीडी थिएटर, लँग्वेज लॅब, फार्म हाउस, परसबाग, मैदान, खेळणी (डिजिटल), ई लायब्ररी, ई-बुक्स, प्रत्येक मूल स्वत:चा लॅपटॉप (कारखान्याने दिलेला) वापरेल. विद्यार्थ्याचा स्वत:चा लॅपटॉप घरी असेल. शाळेतला शाळेत. दोन्ही इंटरनेटने एकमेकांना जोडलेले असतील. त्यामुळे दफ्तर, सँक, टिफिन, वॉटर बॉटल्स सगळ्याची हमाली बंद, रिकाम्या हातानी यायचे आणि डोके भरून न्यायचे म्हणजे नवी शाळा. शिक्षक एस्एम्एस् करून रोज होमवर्क, सुट्टी, रजा, पालक सभांची सूचना देत राहतील. दर आठवड्याची प्रगती व्हॉटस्अप्सवर सचित्र कळेल. आपला मुलगा, मुलगी शाळेत कसा शिकतो, नाचतो, गातो, उत्तर देतो, खोड्या करतो ते पालकांना घरी बसून त्यांच्या टी. व्ही वर / पी. सी. वर पाहता येईल. त्यासाठी शाळेणे मुलाला प्रवेश दिला की केबलने पालकांचे घर शाळेला जोडले जाईल. शाळेची बस जीपीएस युक्त असेल, बस कुठल्या स्टॉपवर आहे ते पालकांना त्याच्या मोबाईलवरून पाहता येईल. शाळेत कँटीन, हॉस्पिटल, डॉक्टर, नर्स, काऊंसिलर, सायकॅट्रीक (बालमानसशास्त्रज्ञ), आहार तज्ज्ञ (डाएटिस्ट), फिजिओथेरपिस्ट, कोच, आर्ट टीचर, म्युझिक टीचर, लँग्वेज टीचर (तोच मराठी, इंग्रजी, हिंदी, जपानी, फ्रेंच शिकवेल, तो भाषांची पॅकेजीस/प्रोग्राम शिकवणारा असेल), सायन्स टीचर (तो बॉटनी, बायॉलॉजी, ऍस्ट्रॉलॉजी, फिजिक्सचे ऍप्स वापरणारा असेल), सोशल टीचर (तो सोशल सायन्स, सिव्हिक्स, कल्चर शिकवेल, तो शाळेतला सगळ्यात श्रेष्ठ टीचर असेल!) मॅथस्, जॉमेट्री, जिऑग्राफी, स्पेस सायन्स, लाईफ सायन्स, कम्युनिकेशन स्किल्स, सॉफ्ट स्किल्स, होम सायन्स, होम ऍप्लायन्सेस, व्हिडिओ कार्टिंग असे नवे विषय शाळा शिकवेल. हे विषय ऐच्छिक असतील. पण नव्या विद्यार्थी, पालकांचा कल त्यांच्याकडे अधिक असेल.
 हायस्कूलला स्पेस सायन्स, वर्ल्ड जॉग्रफी, वर्ल्ड हिस्ट्री, इंटरनॅशनल

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१०४