पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

एकविसाव्या शतकातील शाळेचे स्वरूप


 एकविसाव्या शतकातले शिक्षण देणारी शाळा आकारायची असेल त्याची सुरुवात एका गृहितापासून करावी लागेल. ती म्हणजे आपण ज्या विद्यार्थ्यांना शिकवणार ती मुले संगणकीय (Computer), अंकीय (Digital) क्षमता घेऊन जन्मतात. या पिढीचे नाव आहे I kid Generation. घरातली मुले मोठ्या माणसांपेक्षा रिमोट, मोबाईल्स, व्हिडिओ गेम्स, मेकॅनो, मोटर्स, टू व्हिलर्स न शिकवता शिकतात. म्हणून त्यांना Digital Native म्हटले जाते. ती संगणक युगात जन्मली व अंकीय विश्वात ती वाढली. उलट त्यांचे शिक्षक, पालक संगणकीय जगातील स्थानांतरित होय. त्यांना सगळे संगणकीय कौशल्य ताण देऊन, लक्ष देऊन मुद्दाम शिकावे लागते. त्यांना Digital Migrant मानले जाते. तेव्हा या नव्या अंकीय पिढीच्या शिक्षणाचा विचार जग नव्याने करू लागले आहे.
 या नव्या मुलांची बालवाडीही नवी हवी. म्हणजे बालवाडी शिक्षिका संगणक साक्षर हवी, ती किमान पदवीधर हवी. ती किमान MS-CIT तर हवीच, तिला लॅपटॉप हवा, शाळेचा वर्ग थ्री डायमेन्शनल हवा. फळा स्मार्ट बोर्ड हवा, तो टच स्क्रीनसारखा असतो, त्यास सी.डी., पेनड्राइव्ह, इंटरनेट कनेक्शन जोडले की तुमच्या टच स्क्रीन मोबाईल्स प्रमाणे स्वाईप करून नवे नवे दाखवत, बोलत, गात, नाचत शिकवत रहातो. वर्गात खोटा-खोटा म्हणजे आभासी (Virtual) पूर, भूकंप, चांदणे, जंगल, अंधार, इंद्रधनुष्य, पाऊस, हवा बदल (गरमी, थंडी, ढग) सारे निर्माण करता येते. वर्गाच्या भिंतीही डिजिटल करता येतात. मुलांना अक्षर, अंक ओळख करून दिली की त्यांना पाटी-पेन्सिलची गरज नाही. त्यांना आता शिकवला जातो की बोर्ड. त्यामुळे अक्षर काढणे आता नव्या शिक्षणात

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१०३