पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ओव्या. ॥ ॥ ॥ याभूमंडळपाळा ॥ तूंचिअविचारेंजल्पसी ॥ २७ ॥ मेनिकात्रिदशपंक्ति पावन ॥ लोकमस्तकींजिचेंगमन ॥ मीहीजाणतिजसमान ॥ देवतादेही दिव्यस्त्री ॥ २८ ॥ नरसिंहासांडोनीकपट || मांडियेवैसवकुमार श्रेष्ठ | सत्यधर्मकरीप्रकट ॥ सर्वांवडिलांदेखतां ॥ २९ ॥ सत्यापरतानाहीं धर्म ॥ सत्यतेंचिपरब्रह्म ॥ सत्यापाशीपुरुषोत्तम ॥ सर्वकाळींष्ठित ॥ ३० ॥ अ सत्यतेंचिपैंपातक ॥ असत्यतोचिमहानरक || असत्याचे निसंगेंदुःख ॥ अ नंतजन्मभोगिती ॥ ३१ ॥ सत्यामृताची कनकवाटी ॥ जोडिलीन सांडेभूत टीं || असत्यविषाचीनरोटी ॥ पवित्रहातनातळें ॥ ३२ ॥ तेअवसरींअश रीरवाणी ॥ गंभीरमेघाचियेध्वनी ॥ होतांसकळसभास्थानीं ॥ ऐकतीमं श्रीआचार्य ॥ ३३ ॥ रेरेदुष्यंतराजनृपती ॥ झणीअवमानिशीहेसती ॥ जीक्षोभल्यासर्वजगती ॥ जाळूंसकेक्षणार्धे ॥ ३४ ॥ यालागिपुत्रआपुला घेणें ॥ मानिनीमानें सदनानेणें ॥ आतांप्रतारणेचींवचनें || नबोलेंचिब हुसाळ ॥ ३५ ॥ ऐशीऐकतांआकाशवाणी || टाळीपिटिलीसभास्थानीं ॥ जयजयकारा चियेध्वनी ॥ परमआल्हादसमस्तां ॥ ३६ ॥ राजाह्मणेवृद्ध होऐका || हासर्वअर्थमजठाउका || परिशंकोनियांलौकिका | कृत्रिम वाक्यबोलिलों ॥ ३७ ॥ पहिलेंचिकरितोंअंगीकारू ॥ तरीलोकभाविते अनाचारू || कामबुद्धीनेंराजेश्वरू ॥ निषिद्धमागराहाटला ॥ ३८ ॥ मग उठोनिलवलाहें ॥ पुत्रकडियेघेतलामो || आवडींचुंबूनियांपाहे ॥ वारं वारवदनातें ॥ ३९ ॥ करूनिमूर्द्धाअवघ्राण ॥ आवडींदेऊनिआलिंगन ॥ युवराज्यों अभिषेचन ॥ करिताझालातात्काळ ॥ ४० ॥ आदरें प्रियाध रूनिहातीं ॥ नेलीअंतरगृहाप्रती || आलिंगूनिह्मणेचित्तीं ॥ विषादकां हींनमानावा ॥ ४१ ॥ सत्यवाटावयासाचारें || वाक्यबोलिलोलोकाचा रें ॥ तेंतूंनमानूनियांचतुरे ॥ क्षमा करणेमजलागीं ॥ ४२ ॥ ह्मणोनिवस्त्रे दिव्याभरणें ॥ वोपिलींजैशींशचीरमणें ॥ राजसंपत्तिनिजठेवणें ॥ निवे दिलीतिजहातीं || ४३ || पदमहिषीमाजीमुख्य ॥ पावलीअनेक भोगसुख ॥ पूर्वीच्यानेमाहुनिअधिक ॥ ऐसेंआ प्रतीती ॥ ४४ ॥ दुष्यंतानंतरभर त || वीरप्रतापीख्यात बहुत | दुसराराजाब्रह्मांडांत ॥ नाहींझालापुरु षार्थी ॥ १४५ ॥ ॥