पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 रंगसूत्रे जोड्यांनी असतात हे वर सांगितलेच आहे. अशा जोड्यांपैकी एक विशिष्ट जोडी प्राण्यांचे लिंग ठरवते. माणसामधे या जोडीत एक मोठा धागा (x) व एक छोटा (Y) असतो. ज्या गर्भाला एक x व एक ४ अशी रंगसूत्र जोडी मिळते त्या गर्भापासून पुरुष घडतो, तर दोन्ही x असणाऱ्या गर्भापासून स्त्री घडते. कोंबड्यांमधे याच्या बरोबर उलटी रचना आहे.
 स्त्रीच्या (मादीच्या) शरीरात अंडी तयार होतात. तेव्हा xx या रंगसूत्र जोडीपैकी एक X त्या अंडयाच्या केंद्रात असतो. पुरुषांच्या XY जोडीपैकी निम्म्या शुक्रजंतूंना x आणि बाकीच्यांना Y मिळतात. मातेच्या अंडयाला फलित करणारा शुक्रजंतू X रंगसूत्र धारण करणारा असेल तर मुलगी होते, उलट Y रंगसूत्र धारण करणारा असेल तर मुलगा होतो. म्हणजे मुलगा होणार की मुलगी हे बऱ्याच अंशी पुरुषाच्या शुक्रजंतूवर ठरते. म्हणून, एखाद्या जोडप्याला सगळ्या मुलीच झाल्या तर निव्वळ स्त्रीला दोष देणे बरोबर नाही.
 फलित अंडयाची वाढ मातेच्या शरीरात झपाट्याने होते. ती कशी होणार हे त्या अंड्यातील रंगसूत्रांचा गट ठरवतो. ही रंगसूत्रे म्हणजे गर्भाच्या वाढीचा आणि पुढच्या संपूर्ण जीवनाचा तपशीलवार प्लॅनच म्हणा ना ! मातेकडून मिळणारी पोषक द्रव्ये वापरून या प्लॅन्सप्रमाणे पुढची घडण होते. गर्भाच्या ( आणि जीवाच्या ) प्रत्येक पेशीमधे केंद्रभागी या प्लॅन्सची एक प्रत ठेवून दिलेली असते. गर्भाला मिळणाऱ्या पोषक द्रव्यातून चुकून विषारी पदार्थ आले, तर हे प्लॅन्स गडबडतात. १९६०-६१ साली इंग्लंडमधे कडक डोहाळे लागणाऱ्या बायकांना पॅलिडोमाइड नावाचे औषध देण्यात आले. यांपैकी पुष्कळजणींना अपंग, विद्रुप मुले झाली. LSD सारखी अमली द्रव्ये घेण्यामुळे सुद्धा असा परिणाम होऊ शकतो. मोठ्या प्रमाणात क्ष किरणांचा वापर झाला, तरी अपाय शक्य आहे. आईला गर्भारपणात कावीळ, गालगुंड असे व्हायरसजन्य आजार झाले तरी गर्भाला धोका असतो.

 व्हायरस म्हणजे काय ? ही अति सूक्ष्म आकाराची गोष्ट म्हणजे सजीव आणि निर्जीव सृष्टीची मीलन रेषा. काही थोड्या जीन्स प्रोटीनच्या पिशवीत भरलेल्या असे त्याचे स्वरूप आहे. व्हायरस आपली आपण पुनरुत्पत्ती करू शकत नाही. अनेक निर्जीव पदार्थांप्रमाणे स्फटिकरूपात तो मिळवता येतो. पण संधी मिळाली की एखाद्या

३४ / नराचा नारायण