पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नंतर तो गुणबदल पिढ्यान् पिढ्या कायम राहाणे, हा मात्र नक्कीच व्यर्थ आणि फोल आहे.

 आधी व्हाविलोव्ह आणि इतर तज्ज्ञ कानीकपाळी सांगत होते की, ठाकून ठोकून गळ्यात उतरवलेले गुण पुढच्या पिढीत जात नाहीत.बीजपेशी ( म्हणजेच स्त्रीकेसर आणि पुंकेसर) मधील रंगसूत्रात बदल झाले, तरच पुढच्या पिढीत जातात.( उंदराची शेपूट कापली तरी पिल्ले काही शेपूटतुटकी निपजत नाहीत.)रंगसूत्रात योग्य बदल होण्याकरता संकरीत जीव घडवावे लागतात.हा अर्थात जुना वाद आहे.परिस्थितीने घडवून आणलेले शारीरिक बदल आपोआप पुढच्या पिढीत जातील ही फ्रेंच शास्त्रज्ञ लमार्कची कल्पना बऱ्याचजणांना पटत असे.डार्विनलाही पटली होती.त्यामुळे लायसेंको आणि मंडळींनी हाकाटी केली की, मेंडेलचे जेनेटिक्स हे डार्विनच्या उत्क्रांतिवादाच्या विरोधी आहे.लमार्कच्या विरोधी आहे. पण डार्विन आणि लमार्क दोघेही चूक होते.त्यांना अनुवांशिकतेचे खरे स्वरूप कळले नव्हते.मार्क किंवा त्याच्या कोणत्याही अनुयायाला लमार्कचा सिद्धांत प्रयोगाने पडताळून पाहाता भाला नव्हता. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ऑस्ट्रियातील शास्त्रज्ञ कामारेर याने असे प्रयोग यशस्वी झाल्याचा दावा केला होता. त्याच्या सुइणगिरी करणाऱ्या बेडकाची कथा प्रसिद्ध आहे. या बेडकांमधील नर मादीची फलित अंडी आपल्या पाठीवर घेऊन फिरतात. बेडकांच्या बऱ्याच जातींचा समागम पाण्यात होतो तर यांचा जमिनीवर. इतर बेडकांच्या तळपायावर पाण्यातील समागमासाठी सोईचा काळसर मांसल थर असतो तसा या बेडकांच्या पायावर नसतो. कामारेरने दावा केला की, या बेडकाला पाण्यात राहायला लावून त्याची सुइणगिरीची सवय मोडता येते आणि त्याच्या पायावर काळा मांसल बरही तयार होतो. हा गुणधर्म पुढच्या पिढीतही दिसतो. यावर खूप वाद झाल्यानंतर दोन प्रसिद्ध शास्त्रज्ञांनी या बेडकाची पाहणी केली. त्यांनी धक्कादायक अहवाल दिला की, हा मांसल थर कृत्रिम होता आणि त्याचा काळा रंग म्हणजे चक्क शाई होती. कामारेरची छीथू झाली. त्याने शेवटी आत्महत्या केली. तो खरे तर कम्युनिस्ट सरकारच्या आमंत्रणावरून मॉस्को विद्या- पीठात सन्माननीय प्राध्यापक म्हणून काम करायला जायचा होता. मृत्युपत्रात त्याने आपली सर्व वैज्ञानिक साधनसामग्री सोवियट रशियाला भेट दिली. १९२९ साली

कायकोचा उदयास्त / १०५