पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विज्ञानाकडे रशियन समाजाच्या प्रगतीचे शक्तिमान साधन या दृष्टीने पाहिले. या काळात प्रसिद्धीला येत असलेल्या जेनेटिक्स किंवा अनुवांशिकताशास्त्राचा आर्थिक प्रगतीला, विशेषतः शेती उत्पादनाच्या वाढीला खूप उपयोग होईल अशा कल्पनेने १९२१ साली व्हाव्हिलोव्ह नावाच्या ३६ वर्षांच्या तरण्याबांड आणि नावाजलेल्या शास्त्रज्ञाला लेनिन ' अॅकॅडमी ऑफ ॲग्रिकल्चरल सायन्सेस'चा अध्यक्ष आणि इन्स्टिटयूट ऑफ प्लॅट इंडस्ट्री या संस्थेचा संचालक या पदांवर नेमण्यात आले.केंब्रिजमधे शिकलेल्या या उमद्या आणि कमालीच्या कष्टाळू नेत्याच्या मार्गदर्शना- खाली रशियात या विषयांवरचे संशोधन खूपच फोफावले. व्हाव्हिलोव्हची खात्री होती की, पिकामधे हवे असलेले गुणधर्म आणण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ते गुणधर्म असलेल्या परदेशी जाती आणून त्यांचा स्थानिक जातींशी संकर घडवून आणणे.व्हा व्हिलोव्हच्या संशोधनाची सुरुवातच धान्य पिकांचा बुरशी रोगापासून बचाव करण्याच्या प्रयत्नात झाली. निरनिराळे गुणधर्म असलेल्या पिकांच्या जाती मिळवण्या- साठी व्हाव्हिलोव्ह जगभर अक्षरशः वणवण फिरला. त्याच्या अखत्यारीत उपयुक्त वनस्पतींच्या सुमारे २५ हजार परदेशी जाती रशियात जमल्या. व्हान्हिलोव्हला येता आले नाही ते फक्त हिंदुस्थानात. कारण इंग्रज सरकारने त्याला कधीच परवानगी दिली नाही. पुढे १९३६ साली व्हान्हिलोव्हला इंटरनॅशनल जेनेटिक्स कॉग्रेस या संमेलनाचा अध्यक्ष निवडण्यात आले. त्यानंतर १९३७ साली हिंदुस्थान सरकारने त्याला सन्मानाने आमंत्रण दिले. पण दैवदुर्विलांस असा की, आता सोवियट युनियन सरकारने त्याला परवानगी नाकारली. तो मर्जीतून उतरला होता. १९४० साली व्हाव्हिलोव्हला अटक करण्यात आली. ब्रिटिश सरकारकरता हेरगिरी करणे हा त्याच्यावरचा एक आरोप होता. दोन वर्षांनी व्हा व्हिलोव्ह एका कॉन्सेंट्रेशन कँपमधे मृत्युमुखी पडला. त्याच्या मृत्यूची नेमकी तारीख आणि जागा कोणालाच नक्की माहीत नाही.

 १९२९ साली भरलेल्या रशियन जेनेटिक्स तज्ज्ञांच्या परिषदेचा व्हाव्हिलोव्ह हा अध्यक्ष होता. हा त्याच्या कारकिर्दीचा परमोच्च क्षण. या परिषदेत एका दुय्यम निबंधाचा दुसरा लेखक म्हणून उपस्थित होता. शेतीशास्त्रज्ञ लायसेंको. पुढच्या काही वर्षांत लायसेंकोचे नाव रशियात आणि इतरत्र सर्वतोमुखी झाले, वैज्ञानिक क्षेत्रात

लायकोचा उदयास्त / १०३