पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दायविभाग प्रकरण. जला जितके पैशाची अवश्यकता होती तितका पैसा उत्तराधिका-यांनी खरेदीदारास देऊन - मिळकत परत घेण्याचा त्यांस हक आहे. ई. लॉ. रि. म. सी. व्हा. ८ पृ. ९२." (५७) विधवेने आपल्या मयत पुत्राच्या मुलीच्या लग्नाकरितां कांही पैसा कर्जाऊ घेतला असेल ती रकम तिच्या मरणानंतर नव-याची मिळकत ज्या वारसाकडे गेली असेल त्या वारसापासू न वसूल करण्यास हरकत नाही. इ. लॉ. रि. क. सी. व्हा.६ पृ. ३६.. (५८) अ ने मरण्यापूर्वी केलेले मृत्युपत्रांत आपले बायकोस दत्तक घेण्याचा अधिकार दिला होता. ते मृत्युपत्र त्याचा भाऊ व याणे दाबून ठेविल्यामुळे विधवेनें बरेच वर्षे पर्यंत दत्तक घेतला नाही. दरम्यान तिसऱ्या भावाची विधया क होती ती मयत झाल्यामुळे तिच्या मिळकतीचा चारसा ब याजकडे गेल्यानंतर खरें मृत्युपत्र मिळाल्यावर अचे विधवेने दत्तक घेतला. हा दत्तक होण्यापूर्वी क चे मिळकतीचा वारसा व याजकडे गेला आहे, सबब त्या मिळकतीचा निम्मे हिस्सा घेण्याचा दत्तक पुत्रास हक पोचत नाही. इं. लॉ. रि. क.सी. व्हा. ७ पृ. १७८. (५९) दुसन्या भावाची विधवा मयत झाल्यावर तिच्या नवन्याचा जो हिस्सा पहिल्या भावाच्या पुत्रास वारसाच्या नात्याने मिळाला होता त्यांतील भाग तिसऱ्या भावाच्या विधवेनें सदहूं वारसा गेल्यानंतर दत्तक घेतलेल्या पुत्रास मागण्याचा हक पोचत नाही; कारण तो हिस्सा गेला तेव्हां हा दत्तक जन्मासही आला नव्हता. इं. लॉ. रि. क. सी. व्हा. १२ पृ. १८. (६०) मयताचा मुलगा जन्मतांच बहिरा व मुका असल्यामुळे मिळकतीचा वारसा त्याचे पुतण्यास मिळाल्यानंतर पुढे बहिरा व मुक्याने लम करून झालेल्या पुत्राकडे त्या मिळकतीचा वारसा येत नाही. ई. ला रि. मुं. सी. व्हा. ६ पृ. ६१६. (६) विभक्त मयत भावाने एका देवाची पूजा करण्याकरिता आपले मिळकतीची मृत्युपत्रावरून स्वत्वानिवृत्ति आपल्या विधवेच्या संमत्तीने करून बहिणीच्या पुत्रास मिळकत देऊन टाकिली असतां, ती देणगी व्यवहारोपयोगी आहे. समव विभक्त मयताचे भावास त्या मिळकतीवर हक पोचत नाही. ई. लॉ.रि. मुं. सी. व्हा. ७ पृ. २१७. श्लोक ॥ मनुः ॥ अपुत्राशयनंभर्तुः पालयंतीव्रतेस्थिता ॥ पत्न्यै वदद्यात्तत्पिडंकृत्स्नमंशलभेतच ॥ ७० ॥ १ निपुत्रिक मयताची पत्नी वारस होईल ह्मणून वरील कलमांत सांगितले आहे; परंतु ती जर व्यभिचारिणी किंवा बाटलेली अशा रितीची नसून पातिव्रत्याने, राहणारी असेल तर मात्र विभक्त मयताच्या जिनगीवर तिचा वारसपणा पोचतो. व तिने नवऱ्याचे श्राद्धादिक कर्म करून जिनगीही घ्यावी. उदाहरण.-एका पुरुषास एक किंवा त्याहून अधिक स्त्रिया असून त्यापैकी एक भ्रष्ट, व दुसरी व्यभिचारिणी, व तिसरी पतिव्रता अशा अनेक असतां वि. भक्त मयत निपुत्रिक असून त्याची जी स्थावर जंगम जिनगी असेल त्या प्रसंगी जी बायको नीतीने व पातिव्रत्य धर्माने वागणारी असेल तिणेच आपल्या भ्रताराची सर्व जिनगी घ्यावी. भ्रष्ट व व्यभिचारिणी ज्या असतील त्यांस कांहीं मिक्रं नो कारण नवऱ्याचा उद्धार नीतीने वागणारी जी स्त्री तिजपासून होणार आहे णोन इतरांनी न घेतां तिणेच घ्यावे.