पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/4

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. कुमाने सन १८३,७. साली रघुनाथ शास्त्री दांते याणी धर्मशास्त्राच. प्राकृत भाषांतर केले आहे, त्यांत संस्कृत शब्दांचा फारच उपयोग झाला असल्याने, ज्यास संस्कृताचा अभ्यास असून धर्मशास्त्रांत कांही गति असेल, तर त्यांस मात्र चागले समजतें; केवळ मराठी समजणारांस त्यांतील विषय कांहींच समजत नाहीत. तसेच त्या बुकाची किंमतहो फार असल्या योगाने विकत घेणारा, अलक्ष्य पोचते. सांप्रत सरकाराने धर्मशास्त्रावर पहिल्यापेक्षा विशेषत्वे करून लक्ष्य ठेवल्या प्रमाणे दिसत आहे; कारण स. ज्य. ची व वकिलीची परीक्षा देण्याची इच्छा ज्यांची असेल त्यांस तर धर्मशास्त्र अवश्य असले पाहिजे.. 02 कायद्यां बद्दल अनेक त-हेचे विषय अनेक ग्रंथकारे यांणी केले; परंतु धर्मशास्त्रा बद्दल कोणीच नजर पोचविली नाही. याजकरितां आम्ही यथामतीने दिवाणी कामास ज्या ज्या अवश्य नडी येतात. तितक्या पुरतेच "विज्ञानेश्वर, मयूख, दत्तचंद्रिका, दत्तमीमांसा, व दास ब्रह्मोझ्झ, धर्मसिंधु, व भगद्गीता," इत्यादि ग्रंथांतील मूळस्मृति जितकी लागू आहे ती सहित आधार घेऊन त्यांतील स्त्रीधन, दत्तक, दायविभाग, वेतनादान, संसृष्ट, अनंश, दत्तापदानिक इत्यादि प्रकरणांवर, मुंबई, कलकत्ता, मद्रास आणि अलाहाबाद हायकोर्टाचे निवडक निवाडे (इंडियन लॉरिपोर्ट सुरू झाल्या पासून) चालू साला पर्यंत वाचकांस समजण्यासारखे सारांषाने घेउन ज्या ज्या भागाचे श्लोकावर लागू आहेत त्या त्या श्लोकाचे खाली विशषे समजूत हे सदर देऊन लहान टाइपाने छापिले आहेत... या ग्रंथाची ही तिसरी आवृत्ति पहिल्यापेक्षां विशेष सुधारणा करून छापिली आहे. या पुस्तकास रा. रा. नारायण मोरेश्वर केळकर (दिवाणी, फौजदारी वगैर सर्व संग्रहाचे कर्ते) याणी उत्तम प्रकारे मदत केली त्या बद्दल त्यांचे आम्ही फार आभारी आहोत. सूचना-हे पुस्तक विकत घेणारांस आम्ही आपली सही किंवा शिक्का करून देऊ. ज्या पुस्तकावर आमची सही किंवा शिक्का नसेल ते पुस्तक आचे परवानगी शिवाय विकले गेले आहे. असे समजले जाईल. नारायण वासुदेव फडके.