Jump to content

पान:द्रोपदीस्वयंवर नाटक.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

द्रौपदी स्वयंवर नाटक. वेअघनिवारिणी॥ध्रु०॥ इंद्राणी ब्रह्म शक्ति गुहस्वरूपि पणी ॥ कौबेरी धांव त्वरें अमरस्वामिनी॥ चागीश्वर पावमलाचेदरूपिणी ॥ खलविनाशिनी ॥ नारायणि०॥ १॥ पाशांकुश शंखचक्र तुल धारिणी॥ कालिमहाक- मला तूं महिषमर्दिनी ॥ महा सरस्वती अयेभक्तरक्षिणी ॥मृगपवाहिनी॥नारायणि०॥ २॥ स्थिर चरिं तूं व्यापक गेपाव अज मला ॥ भवसागरिमग्न बहू जीव भासला । रसनायीं वसुनि वद्धि काव्य सत्कला ॥ मोक्षदायिनी ॥ नारायणि०॥ ३॥ बाळकृष्ण तनय सरखाराम दास हा कू- मदृष्टि करुनि स्वयें कौतुकें पहा॥हृदयपुरीं येऊनियां तूं सुर्खे रहा ॥ धांव धांचणीं ॥ नारायणी ०॥ ४ ॥ (सरस्वती प्रगट होते. २ - सूत्रधार ० - हे जगज्जननी, चरणकमलाचे ठायीं वंदन करिनों. सरस्वती०- वत्सा भागवता कल्याण. माझ्या आगमनाची इच्छा कि- मर्थ केलीस? असें तुला संकट कोणतें प्राप्त झालें तें निवेदन कर. सूत्रधार०- जगदंबिके, आतां मी या रंगभूमिकेचर द्रौपदी स्वयंबर नाट- काचा अभिनय करून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. त्यास माझीं अज्ञान बालकें या सभेत कशीं भाषणे करितील अशा काळजीत होतो. ह्म- णून आपल्या चरणाचे स्मरण केले. आतां मनोभिलषित कामना परिपू- र्ण करणार आपण समर्थ आहांन. सरस्वती०- भागवत्ता, माझ्या वरदानें करून तुझीं बालकें सुरगुरुस- मान भाषणें करून सभाजनाचें मनोरंजन करितील. हा माझा पूर्ण आ- शीर्वाद आहे. आतां मी स्वस्थानी गमन करितें. सूत्रधार ० - मातुश्री, बंदन करितों. (नंतर सरस्वनी निघून जाते.) विदूषक ०- कां सूत्रधार बावा, झाले का नाटक, आतां मालवा तर दिवे, झाडो जाजम, चला घरीं, झणजे झालें. 6- सूत्रधार - अरे वेड्या असे विपरीत भाषण कांबरें करिनास १ पहा आता हे मंगलाचरण झालें. नाटक होणें तें पुढेंच आहे.