Jump to content

पान:द्रोपदीस्वयंवर नाटक.pdf/२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री प्रस्तावना द्रौपदीस्वयंवर नाटक. प्रस्तुत या नाटकांतील इतिहास लिहिण्याचे विशेष प्रयोजन दिसत नाही. का- रा तो श्रीमयासमुनीनी महाभारतातील आदिपर्वात सविस्तर वर्णिला असून या भरतरखंडांतील आबालवृद्ध लोकांस प्रायः विदित आहे. व त्यांचे दिग्दर्शन मस्तुत नाटकाच्या नामनिर्देशावरून ही सामान्यतः होण्यासारखे आहे. तत्रापि कवीनें द्रौपदीस्वयंवराची कथा कोठपासून घेऊन तिचें पर्यवसान कोठपर्यंत केलें आहे. हे पुढील विषयावरून सहज कळेल. त्या नाटकांत पांडव लाक्षागृहांतून विदुरनिर्मित विवराने बाहेर पडून त्या गृहदाहरूप महासंकटांतून मुक्त झाले. येथून आरंभ करून एका मवेशी- त द्रौपदी व धृष्टद्युम्न यांची उत्पत्ति संवादाचे मिषानें वर्णन केली आहे. नंतरव्या- साची व पांडवांची भेट व त्या प्रसंगी द्रौपदीची पांचपतींविषयींची पूर्वकथा सां- गितली आहे. नंतर चित्रसेनगंधर्वाची गांठ, त्याशी केलेलें युद्ध वुटे केलेलें मि- यत्व सांगून पांचालपुरास पांडवांचें गमन सांगितले आहे. नंतर सभेत प्रति- ज्ञा जिंकून ब्राह्मणवेषानें द्रोपदीचें स्वीकरण आणि मातुश्रीचे आज्ञेवरून वल्या- सोक्तीवरून शेवटी तिचा पांच मकारें विभाग वर्णन शेवटी प्रकटरूपाने लग्नस- मारंभ वर्णन केला आहे. ह्यांत शृंगार, वीर, करुण, अद्भुत आणि हास्य हे रस प्रसंगोपात वर्णि- ले आहेत. आतां मूलकाव्य वर्णित कथेस नाटकाचे रूप देण्याचा उद्देश इतकाच आ. हे की, काव्यांतून उदार कीर्ति अशा महापुरुषांची चरित्रे वाचल्यापेक्षा ती मल्य- क्ष अभिनयपूर्वक प्रयोगांत पाहिली असतां प्रेक्षकांच्या मनावर त्या पुरुषां- च्या सद्गुणांचा व आचरणाचा ठसा तत्काळ व दृढ उत्पन्न होतो. आणि त्यासु- के आपण त्यांचे अनुकरण करावें अशी बुद्धि उत्पन्न होने हैं जासून आम्ही हे नाटक तयार करविलें आहे. तर यास सर्व समंजस लीक आश्रय देतील अशी आशा आहे. .रावजी श्रीधर गोंधळेकर.