पान:देशी हुन्नर.pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
देशी हुन्नर.

प्रकरण १.

चित्ररेखन.

 भरतखंडांत चित्ररेखनविद्या प्राचीनकाळी लोकांस माहीत होती इतकेच नाही, तर चित्रे काढण्याच्या कामांत ते इतर राष्ट्रांच्या पुढे बरेच सरसावले होते, असे मानण्यास हरकत नाही. यक्ष व नाग हे चिताऱ्याचे काम करीत असत, व उखेची सखी चित्ररेखा इनें त्रैलोक्यांतील मुख्यपुरुषांचे चेहरे काढून दाखविले होते. ह्या गोष्टी पुराणांतील असल्यामुळे त्या इतिहासांतील गोष्टीप्रमाणे केवळ खऱ्या मानतां येत नाहीत असे म्हणणाऱ्या लोकांकरितां कालिदासाच्या वेळी राजेलोक चित्रेंं काढीत असत, ह्या गोष्टीचा पुरावा येथे दिला पाहिजे असे नाहीं; कारण तो सर्व प्रसिद्ध आहे. तशांत अभिज्ञानशाकुंतलनाटकांतील शकुंतलेची तसबीर थोड्याच दिवसांपूर्वी आण्णासाहेब किर्लोसकरानी आमच्या डोळ्यांपुढे उभी केली होती, त्यामुळेंं ती तर आबालवृद्धांस माहीत आहे. ह्याही गोष्टी एकीकडे ठेविल्या आणि “ चक्षुर्वैसत्यं " असे म्हणून वागणाऱ्या मंडळीची संपूर्ण खात्री करावयाची, असा जरी आह्मी निश्चय केला, तरी दोन हजार वर्षापूर्वी आमच्या देशांत चित्ररेखन फार चांगल्या प्रकारचे होत असे, असें आज सिद्ध करून देतां येत आहे. या गोष्टीचे प्रमाण निजामशाईमध्ये अजंटा या नांवाची लेणी आहेत तेथें आजलाही प्रत्यक्ष प्रष्टीस पडत आहे. स्वदेशी व पाश्चिमात्य विद्वानांच्या मताने अजंटा येथील लेणींं रंगविण्यास ख्रिस्तिशकाच्या पूर्वी सुमारेंं दोनशेंं वर्षांपासून सुरवात होऊन ख्रिस्तिशकाच्या आठशेंं वर्षांच्या सुमारास तेंं काम पुरेंं झालेंं असावेंं असेंं ठरले आहे. या लेण्यांतील चित्रं बौद्धधर्माची आहेत, व ह्या धर्माचा आपल्या देशांत दोन हजार वर्षापूर्वी प्रसार झाला होता, त्यावरून वरील ह्मणणेंं सप्रमाण आहे, असेंं सिद्ध होते. आतां ही लेणींं इतकींं जुनींं असतील तर आजपर्यंत शिल्लक राहिली कशी ? गिजनीच्या महंमदाने सोरटी सोमनाथाचा फडशा उडविला व औरंगजेबासारख्या धर्मवेड्या सत्ताधि-