पान:देशी हुन्नर.pdf/167

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १६९ ]

धून कटारीच्या आकाराची नक्षी असते. 'लाल कटार' कापडांत पट्टे व कटार असेच असून भुईमात्र तांबडी असते. बुलबुलचसम हें कापड केशरी रंगाचें असून त्यांवर चौकटीच्या आकाराची नक्षी असते. लालकदम फुली हें कापड तांबडे असून त्याजवर कदंबाच्या फुलांसारखी केसरी रंगाची नक्षी असते. साधी कदंब फुली यांत पांढऱ्या भुईवर तांबड्या फुलांचें पट्टे असतात. साधीवेल फुली यांत पांढऱ्या भुईवर किरमिजी निळ्या व पांढऱ्या या तीन रंगाच्या मिश्रणाच्या नक्षीचे पट्टे असून त्यांत रुई फुलें सोडविलेलीं असतात. काळे पट्टेदार याकापडास जांबळ्या भुईवर किरमिजी व पांढरे व किरमिजी आणि पिवळे असे पट्टे असतात. लाल पट्टेदार यांत किरमिजी भुईवर केशरी पट्टे असून त्या पट्यासच जांबळी व पांढरी कोर असते. याखेरीज सरा बार सिरार्जा, साधाबडा कदर फुली, सफेत कोंरदार, काळा मच्छलीकांटा, लाल कोरदार व कंकिणी इत्यादि पुष्कळ प्रकार आहेत.

 वायव्य प्रांतात 'संगी', ह्यणून एका जाताचें गर्भ सुती कापड तयार होतें त्यांत 'टसर ' रेशीम मिश्र असतें तसेंच गुत्तेर ह्मणून एक कापड आहे त्यांत तुतांच्या झाडावरील किड्यांचें रेशीम असतें. ह्या दोन्ही तऱ्हा सन १८६५ सालीं निघू लागल्या असें ह्मणतात. अजीमगडास हें कापड विकणारे सहा सात, असामीच आहेत परंतु एका वर्षांत ते सुमारें तीन चार लाख रुपयांचें काम करितात.

 मश्रूबद्दल मागें माहिती दिलीच आहे. अमदाबादेस मश्रु होते त्याप्रमाणें बनारस येथेंही होते. रेशमी कापड वापरण्याची मुसलमान लोकांस परवानगी नाहीं त्यामुळें मश्रु सुजाखानी अथवा सुकी, गुलबदन, सुफी, खेस, इलाइचा, हिमु इत्यादि मिश्र कापड मुसममान लोक वापरतात.

 फानेल व काश्मीर यानांवानें प्रसिद्ध असलेले मिश्र कापड काश्मीर देशांत होते.

रंगारी काम.

 सन १७८७ च्या सुमारास सर विलियम जोन्स नांवांच्या एका मोठ्या तत्व वत्त्यानें लिहिलें होतें कीं, हिंदुस्थानांतील रंगारी पक्के रंग तयार करितात तसें जर आमच्या विलायती व्यापाऱ्यांस साधेल तर आह्मांस सोन्याची खाणच सांपडली असें ह्मटले पाहिजे. या गोष्टीस आज सुमारें शंभर वर्षे झालीं. इतक्या अवकाशांत सगळेंच उलट झालें आहे. विलायतेस हिंदुस्थानांतील चीट