पान:देशी हुन्नर.pdf/143

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १४५ ]

मद्रास इलाख्यांत गंजम जिल्ह्यांत किमेडी व चिंगलपट जिल्ह्यांत पलीकत या दोन गांवीं असलें सामान होतें. गंजम येथें विलायती तऱ्हेच्या करंड्या तयार करून त्यांस रंगही विलायतीच देतात. पलीकत येथें पूर्वी देशी रंगाच्या करंड्या होत असत ; परंतु अलीकडे तेथीलही लोक विलायती रंग वापरूं लागले आहेत. या इलाख्यांत तिनेवेल्ली जिल्ह्यांत टेनकशी मदुरा जिल्ह्यांत अनंतपूर व पेरियाकुलम, दक्षिण कानडा जिल्ह्यांत सालेम, तंजावर जिल्ह्यांत सियाली, तंजावर, तसेंच गोदावरी, कडप्पा व विजागापट्टण या गांवींही किरकोळ सामान होतें. कुर्ग येथें वेताच्या करंड्या तयार होतात. आसास प्रांती बांबूचें व वेताचे सामान पुष्कळ होतें. असामी लोक बुरडी टोपी डोक्यांत घालतात. या टोपीस असामी लोक, झापी म्हणतात. लंडन येथील प्रदर्शनांत आसाम प्रांतांतुन वेताच्या जाळीचा एक मोठा थोरला सुंदर पडदा गेला होता.

 हात्र्या व चटया हिंदुस्थानांत जिकडे तिकडे होतात. बांबूचे तट्टे कुडासारखें बांधून भिंती करण्याची बंगाल्यांत चाल आहे. ताडाच्या व खजूरीच्या चटया गरीब लोक त्या प्रांतीं पुष्कळ वापरतात. बंगल्यांतील मादुर व सीतळपटी नांवाच्या गवताच्या चटया फार सुरेख असतात. ह्या चटयांस आपण चिनई हात्र्या ह्मणतों. परंतु त्या मुख्यत्वेंकरून बंगल्यांतील मिडनापूर जिल्ह्यांत तयार होत असतात. बाबू त्रैलोक्यनाथ मुकरजी याचें असें म्हणणें आहे कीं आमच्या देशांतील मसनद या चटयाची केलेली असे. आणि म्हणूनच या हत्र्यांस मजलंद म्याट्रस असें इंग्रज लोकांनीं नांव दिलें आहे.

 मद्रासइलाख्यांत पालघट व तिनेवल्ली या दोन गांवीं फार सुरेख चटया तयार होतात. या गांवीं चटया करण्यास नदींतील लव्हाळ्याचा उपयोग होतो. तिनेवेल्ली येथील हात्र्या इतक्या बारीक व मऊ असतात कीं एका मनुष्यास निजावयास पुरेल इतकी मोठी हात्री गुंडाळून, हातांत घेण्याच्या कांठी येवढ्या पोकळ कांठीत ठेवितां येते. पालघाट येथील हात्र्यांवर त्रिकोनी, चाकोनी, षड्कोनी, इत्यादि भूमितींतील सरळरेषाकृति काढलेली असते. ह्या दोन ठिकाणच्या व वेलोर येथील हात्र्या एका प्रकारच्या ओबड धोबड मागावर काढितात. मागावरील ताणा सुताचा असतो. व 'वाणा' म्हणजे आडवे धागे लव्हाळ्याच्या बारीक चिपाचे असतात. या चिपांस कधीं कधीं रंग देतात. काळा रंग लोखंड, मायफळ, व बाभळीच्या शेंगा यापासून होतो. चिपा रक्तचंदना-    १९