पान:देशी हुन्नर.pdf/144

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १४६ ]

च्या व कासणीच्या पाल्याच्या काढयांत उकळविल्या ह्मणजे तांबड्या होतात. पिवळा रंग हळदी पासून करितात; परंतु तो टिकत नाहीं.

 बंगाल्यांत कर्दळीच्या सोपटाच्या चटया करितात. त्यांस 'सीतळपाटी' असें नांव आहे.

 असें म्हणतात कीं उत्तम सीतळपाटी फारच गुळगुळित असते. व तिच्यावरून सर्पास सुद्धां जातां येत नाहीं. सीतळपाटी अंगास गार लागते त्यामुळें ती फार थंड आहे असें समजून बंगाल्यांतील श्रीमंतलोक उन्हांळ्यांत आपल्या बिछान्यावर पलंगपोसा ऐवजीं वापरतात. उत्तम सीतळपाटी फरीदपूर, बाकरगंज, टिपेरा, व चितागांग चा जिल्ह्यांत होते. हें काम बायका करीत असतात. नवऱ्या मुलीच्या कौशल्यानुरूप तिच्या बापास या कामावरून उलट हुंडा मिळत असतो. एका सीतळपाटीची किंमत पांचपासून शंभर रुपये असते.

 ब्रम्हदेशांत सिळहर गांवीं हस्तिदंताच्या चटया होतात.

 घायपाताच्या दोऱ्याच्या गोणपाटासारख्या केलेल्या जाड पट्यांस इंग्रजींत म्याट्रेस म्हणजे हात्र्या अशीच संज्ञा आहे. काथ्याच्या तरटालाही साहेब लोक म्याट्रेसच म्हणतात. घायपाताची तरटें हजारी बाग, लखनौ, अलाहाबाद धारवाड येथील तुरुंगांत होऊं लागली आहेत. काथ्याची तरटें मुंबई व समास इलाख्यांतील पुष्कळ तुरुंगांत होतात. मुंज नामक गवताचीं तरटें अलाहाबाद लखनाै, बनारस, दिल्ली, लुधियाना, अंबाला, सियालकोट, गुजराथ व इतर पुष्कळ ठिकाणच्या तुरुंगांत होतात. मुंज गवताची ओलीं ताटें लाकडाच्या कुंदीनें ठोकून धुतात व त्याजवर रंग देऊन विणण्याकरितां तयार करितात.
 मद्रास इलाख्यांत बाबू, वेत, ताडपत्री, खजूरीची पानें केवड्याची पानें व लव्हाळे या सर्व पदार्थाच्या चटया होतात.

 पंखे मुख्यत्वेंकरून बांबू, वाळा, गुंज गवत, खजूरी, मोराचीं पिसें हस्तिदंत अभ्रक, व कागद इत्यादि पदार्थाचे करितात. ताडाचे मोठे पंखे मद्रास इलाख्यांतून येतात. बांबूचे पंखे जिकडे तिकडे तयार होतात. ते हलक्या किमतीचे असून त्यांजवर नक्षीही फारशी नसते. वाळ्याच्या पंख्यावर कधीं कधीं भरत कामाची, टिकल्याची, मोरांच्या पिसांची, व इतर पुष्कळ नक्षी असते. सां-