पान:दूध व दुभते.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दूध व दुभते. [प्रकरण ___डॉक्टर लोकांकडे तांबड्या व निळ्या रंगाचे 'लिट्मस् पेपर' असतात, त्यांचाच रासायनिक परीक्षेमध्ये नेहमी उपयोग करितात. दूध जरी आपणास गोडसर लागते तरी त्यांत 'आम्ल ' जातीचे व "मस्म" जातीचेही पदार्थ आहेत. असें लिटमसूच्या प्रयोगाने सिद्ध होते. या प्रयोगास 'धारोष्ण ' दध घेऊन दोन्ही रंगांचे लिटमस पेपर दुधांत अर्धे बुडवावे व थोड्या वेळाने बाहेर काढ्न पाहिले असता दोन्ही तुकड्यांवर परिणाम झालेला दिसतो. असो. आतां मागें सांगितल्याप्रमाणे दुधांत पाणी, ओशटबिंदु, साखर, नायट्रोजनयुक्त पदार्थ व शार ही असतात. पैकी पाणी व साखर खेरीज करून इतर द्रव्ये दोन अथवा अधिक प्रकारची आहेत असें रासायनिक परीक्षणाने सिद्ध झालेले आहे. त्याचा तपशील खाली दिल्याप्रमाणे आहे. (१) ओशट बिंदु:-लोण्यांत अगर चांगल्या तुपांत खाली दिलेले नऊ निरनिराळ्या जातीचे ओशट पदार्थ असतात. । ब्यटिरिन:-लोणी जास्त दिवस ठेविल्यास ते बिघडल्याने फार वाईट घाण येत असते. ती याच पदार्थामुळे येते. [२ ] कॅप्रॉइन्. [३] कॉपिलिन्. [ 7 ] कॅप्रिन्. [५] लॉरिन्. [६ ] मायरिम्टिसिन्. [७] पामिटिन. [८] स्टियरिन्. नियरित [९] ओलेइन. (२) नायट्रोजनयुक्त पदार्थ:-हे सुद्धा दोन जातींचे आहेत. [१] केलीना-यास कोणत्याही आम्लाचे योगाने घनरूप येते. दूध विरजल्यावर किंवा नासल्यावर जो घट्ट पदार्थ तयार होतो, तो याचाच झालेला असतो. दह्यास घट्टपणा यामुळेच येतो. [२] अलव्यूमिनः-याचे प्रमाण दुधांत थोडे असते. यावर आम्लाचा परिणाम होत नाही, परंतु उष्णतेने यास घनरूप येते. याचे प्रमाण चिकांत फारच असते व म्हणूनच चिकापासून तो तापवल्याने 'खरवस ' तयार करितां येतो.