पान:दूध व दुभते.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१० वें.] दुधाचे गुण-धर्म. रंग पांढरा असतो' असे आपण समजतों, पण थोडें सूक्ष्म रीतीने पाहिल्यास काहींच्या दुधाचा रंग निळसर पांढरा' तर काहींच्याचा 'पिवळसर पांढरा, वगैरे रंगाची छटा दुधांत दिसते. म्हशीचे दूध आणि गाईचे दूध रंगावरून तेव्हांच ओळखता येते. तसेच जनावर व्याल्यावर जो प्रथम 'चीक । अथवा 'सोयराचे दूध ' काढतात त्याचा रंग किती तरी पिवळा असतो. निरनिराळ्या प्राण्यांचे दुधास निरनिराळा वास येत असतो, व त्यावरून शेळी मेंढीचें दध आणि गाई-म्हशीचे दूध तेव्हांच समजतें. दुधाची चव घेतल्याने ती गोडसर लागते, तरी बारकाईने चावून पाहिल्यास प्रत्येक जातीच्या जनावरांच्या दुधाची चव अगदी भिन्न आहे हे तेव्हांच कळते. शिवाय जनावर गाभण झाल्यावर त्याचे दुधास कांही एक निराळीच खारटशी चव येते. दूध एका भांड्यांतन दस-या भांड्यांत ओतल्यावर किंवा जमिनीवर थोडेसे टाकून त्याचे पातळपणाविषयी थोडीशी कल्पना करितां येते. आता दध ज्या पुष्कळशा द्रव्यांचे झालेले आहे. ती दव्ये को असतात हेही पाहूं. दूध स्थिर ठेविलें म्हणजे त्यावर ओशट बिंदूंचा थर जमतो त्यावरून व दुधाचा एक अगदा लहान थेब सूक्ष्मदर्शक यंत्रांतून पाहिला असता त्यावरून ओशट बिंदू दुधांत तरंगत असतात,असे आढळते. दधांतील नायट्रोजनयक पदार्थाचा काही भाग दुधांत असलेल्या पाण्यांत तरंगत असतो, व त्यामच दधास पांढरा रंग येतो. दुधांत असलेली साखर, कांहीं क्षार, आणि कांड नायटोजनयुक्त पदार्थ हे पाण्यात विरलेले असतात. दुधाचे विशिष्टगरुत्व नेहमी अमकच असते असे नाही, तर मुख्यत्वेकरून दधांतील घटकद्रव्यांचे परस्पर प्रमाणावर ते अवलंबून असते; व ते विशिष्ट-गुरुत्व-मापक यंत्राने तेव्हांच काढितां येते. साधारणपणे चांगल्या दुधाचे विशिष्ट गरुत्व १०३२ ( पाणी १००० ) असते. एक शेर पाणी वजन भरेल अशा त-हेचे जर एक माप तयार केले, आणि त्याने १००० मा पाणी व १००० मा दूध घेतले, तर त्या सर्व दुधाचे वजन त्या सर्व पाण्याचे वजनापेक्षा ११ शेरांनी ज्यास्त भरते. रासायनिक परीक्षण. कोणत्याही पदार्थाचे रासायनिक गुण-धर्म काढतांना त्याचे विघटीकरण करून (१) तो पदार्थ कोण-कोणत्या 'मूलतत्वांचा' बनलेला आहे (२) त्या मलतत्वांचे प्रमाण काय आहे व (३) त्यांचा परस्पर संबंध कसा काय आहे हे काढतात. 'लिट्मस ' रंगाचे योगाने काही विशिष्ट रासायनिक गुण समजून येतात.