पान:तुतीपासून रेशीम.pdf/२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रस्तावना. गेल्या दहा वर्षीपासून आह्मां महाराष्ट्रीयांत रेशमाच्या किड्यांचें नांव वारंवार निघालेले ऐकण्यांत येतें. व त्या अवर्धीत बऱ्याच जणांनी रेशमाचे किडे मौजे खातर पाळूनही पाहिले आहेत. पण शें- दोनशें किडे पाळून त्यांवर प्रयत्न करणारांस कांहीं एक उत्पन्न होण्या- सारखे नसल्याने ज्यांनीं ह्मणून हा प्रयत्न केला, त्यांनी थोड्याच दिवसांत तो सोडून दिलेला आढळून येतो. रेशमाचे किडे पाळून हा धंदा कसा करावा, याचें सविस्तर विवेचन करणारे पुस्तक आमच्या महाराष्ट्र वाङ्मयांत नाहीं. ही उणीव अंशतः भरून काढण्याचा हा अल्प प्रयत्न केला आहे. त्याचा कांहीं उपयोग आमच्या महाराष्ट्री- यांस होईल, अशी आशा आहे. हैं पुस्तक प्रसिद्ध करण्याच्या कार्मी गोवर्धन प्रेसच्या व्यवस्था- पकांनी वेळोवेळीं जी योग्य मदत केली आणि ज्या अनेक उपयुक्त सूचना केल्या, त्या सर्वोबद्दल आझी त्यांचे फार आभारी आहो. तसेंच रा. अनंतरावजी कुळकर्णी यांनी आह्मांस दिलेल्या बऱ्याच लेखनसाहाय्याबद्दल आझी त्यांचेही आभार मानून ही प्रस्तावना पुरी करतो.