पान:तुतीपासून रेशीम.pdf/१६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६५ अडवें तिडवें ओढावें, व निपटून पुन्हां डुबक्या देऊन त्यांची लांबच लांब अशी एक बट तयार करावी. त्या बटींत जर कांहीं केरकचरा असेल, तर तो डुबक्या देतांना चिमटीनें वारंवार काढीत जावा. आणि त्या बटींत जर कांहीं घुले असले, तर तेही चिमटीनें धरून काढून टाकावेत. असें केल्यानें तें रेशीम अव्वल वेस्ट सिल्क ह्मणजे फाटाचें तयार होतें, व त्यास भावही चांगला येतो. जर केरकचरा वेस्ट सिल्क मध्ये तसाच राहू दिला, तर तें वेस्ट सिल्क हलक्या दराने विकलें जातें. णून प्रत्येकाने या कोसल्यांच्यावरील गुंतागुतीच्या आव- रणाची मेहनत घ्यावयास चुकूं नये. पटवेकरी लोक गोंडे वगैरे करण्याकरतां ज्या रेशमाचा उपयोग करितात, तें असलेंच वेस्ट ह्मणजे गुंतागुतीचें रेशीम असतें. या रेशमा- लाच रंग वगैरे देऊन फाट या नांवाने त्यांचा उपयोग करतात. याप्रमाणें काम करून दोन मनुष्यें, पैकीं एक तंतु उकलंणारा व दुसरा रहाट फिरविणारा, मिळून एका दिव- खांत आठ तास काम करून जवळ जवळ वसि ते पंचवीस तोळे अव्वल प्रतीचें रेशीम व तीन ते चार तोळे दुय्यम नंबरचें रेशीम उकलून तयार करितात. ह्मणजे रोज तीन ते साडेपांच शेर कच्या कोसल्यांचें रेशीम ते काढूं शकतात. एक शेर रेशीम तयार करण्यास साडेअकरा शेर कोसले लागतात. पण जर तेच कोसले चांगले वाळलेले असतील, तर जवळ जवळ साडेचार शेर कोसले एक शेर