पान:तुतीपासून रेशीम.pdf/१६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६४ तो तसाच कढईत राहूं दिला, तर दुसऱ्या खेपेच्या कोस- ल्यांचे तंतु उलगडले जात असतां त्यांत मिसळून तो कचरा अथवा गुंताळा वारंवार तारडोळ्यांच्या छिद्रांशीं येऊन वारंवार तार तुटण्याचा संभव असतो, ह्मणून प्रत्येक वेळीं असा जमलेला कढईतील पाण्यांतील केरकचरा वगैरे चाळणीने काढून टाकीत जावा. असें केल्यानें कामांत वरचे वर अडथळा यावयाचा नाहीं. असला केरकचरा काढ- ण्यास कित्येक ठिकाणीं पसरट झाऱ्यांचा उपयोग करितात. जपानी तऱ्हेच्या कढईत असला केरकचरा काढण्याची फार नामी सोय केलेली असते. त्यांच्या कढईचे तळाशीं कढईतील सर्व पाणी निचरून जाईल, अशी नळ्या लावून सोय केलेली असते. आम्ही शेवटीं आकृतींत जी कढई दाखविली आहे, त्यांत पाहिलें असतां पाणी निचरून जाण्याकरितां कशी सोय केलेली असते, हें सहज समजून येईल. अशा तऱ्हेनें कढईंतील पाणी नाहींसे केल्यावर कढईचे तळाशीं केरकचरा वगैरे जे कांहीं राहिलें असेल, तें काढून घ्यावें, व पुन्हां त्यांत उकळणारे पाणी घेऊन कोसले शिजवून पूर्ववत् क्रियेनें रेशीम उकलण्यास सुरू करावे. प्रत्येक वेळीं कोसल्यांच्या तारा उलगडण्याचें संपल्यावर कोसल्यांच्यावरील आवरणांची गुंतागुतीची जी बट तोडून बाजूला ठेवलेली असते, ती घेऊन कढईतील उकळणाऱ्या पाण्यांत बुडवावी. ह्मणजे त्या लडीचा अगर बटीचा शेवट धरून त्यास पाण्यांत डुबक्या दाव्यात, व बटीस फोडून