पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



२१
२०. चित्तशुद्धि.

  ८०. चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती । व्याघ्रही न
खाती सर्प तया ॥ १ ॥ विष तें अमृत आघात तें हित ।
अकर्तव्य नीत होय त्यासी ॥ २ ॥ दुःख ते देईल सर्व
सुख फळ । होतील शीतळ अग्निज्वाळा ॥ ३ ॥ आवडेल
जीवां जीवाचिये परी । सकळां अंतरीं एक भाव ॥ ४ ॥
तुका ह्मणे कृपा केली नारायणें । जाणिजेते येणे अनुभवें ॥ ५ ॥

  ८१. जाऊनियां तीर्था काय तुवां केलें । चर्म
प्रेक्षाळिलें वरी वरी ॥ १ ॥ अंतरींचे शुद्ध कासयाने जालें ।
भूषण त्वां केलें आपणया ॥ २ ॥ वृंदावन फळ घोळिलें
साकरा । भीतरील थारा मोडेचिना ॥ ३ ॥ तुका म्हणे
नाहीं शांति क्षमा दया । तोंवरी कासया फुदा तुह्मी ॥ ४ ॥

  ८२. चंदनाच्या वासे धरितील नाक । नावडे कनक
न घडे हें ॥ १ ॥ साकरेची गोडी सारिखी सकळां ।
थोरां मोठ्या बाळां धाकुटिया ॥ २ ॥ तुका म्हणे माझें
चित्त शुद्ध होते । तरि कां निंदिते जन भज ॥ ३ ॥

  ८३. याचि नांवें दोष । राहे अंतरीं किल्मॅिश ॥ १ ॥
मना अंगीं पुण्य पाप । शुभ उत्तम संकल्प ॥ २ ॥
बीजाऐसी फळे । उत्तम कां अमंगळे ॥ ३ ॥ तुका म्हणे
चित्त । शुद्ध करावें हें हित ॥ ४ ॥

  ८४. उचित जाणावें मुख्य धर्म आधीं । चित्त शुद्ध
बुद्धी ठायीं स्थीर ॥ १ ॥ न घालावी धांव मनाचिये

_____________________________________________

१ ताडण. २ धुतलें. : आंतील कडुपण. ४ गर्व करतां. 

५ पापवासना