पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१०७
अभिप्राय.

 रा० अनंत सखाराम आठल्ये. बी. ए. प्रिन्सी. आर्यन.
ए. सो. हायस्कुलः–वेंचे फार मार्मिकपणाणे काढले
ले असून सुबोध आहेत.
हे वेंचे वाचून तुकारामाच्या कवित्वाची कल्पना फार चांगली होईल.
शेवटीं जोडलेल्या कोशामुळे पुस्तकाची उपयुक्तता फार वाढली आहे.
शाळेत लावण्याकरिता योग्य वेंच्यांची हल्लीं भासून येणारी वाण या
पुस्तकाने भरून येईल यांत संशय नाहीं. मुलां मुलींनाच नव्हे तर
सामान्य वाचकांनासुद्धा आपण ह्या पुस्तकाच्या रूपाने करमणुकीचे
व ज्ञानप्राप्तीचे साधन करून ठेविलें आहे.


 रा. वामन रामचंद्र जोशी. बी. ए. अध्यायक आर्यन
ए. सो. हायस्कूल-* * रा. वावीकर ह्यांची व मराठी वाचकांची
ओळख बरीच जुनी आहे व त्यांचा स्वभाषा व्यासंग स्तुत्य आहे.
प्रस्तुत पुस्तक फार मेहनतीने तयार केले आहे. अभंगाची निवड
काळजीपूर्वक केलेली असून पुस्तकाचे शेवटीं कठिण शब्दांचे अर्थ
दिले आहेत. धार्मिक विषयांवरील लेखक व वक्ते त्यांनाही या
पुस्तकाचा हरप्रसंगी उपयोग होऊन गाथेतून स्वतः अभंग शोधण्याचे
त्यांचे श्रम वाचतील.

 रा० एकनाथ गणेश भांडारेः–मुलांमुलींना हे * निवडक अभंग '
फारच उपयुक्त होणार आहेत. त्यांची मनोवृत्ति उच्च, प्रगल्भ, धर्मशील,
व ईशसेवानिरत होण्यास आपलें पुस्तक फार चांगले साधन आहे.
नीति शिक्षणाचा अभाव आमच्या सरकारी व कांहीं खाजगी शाळांतून
बराच दिसून येतो. करितां ती उणीव भरून काढण्याचे जर सरकाराने
!मनावर घेतले तर अशा पुस्तकास