पान:तुकारामबोवा.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
तुकारामबोवा.
(वृत्त व ग्रंथ. )
१. विषयप्रवेश.

श्री साधु हो ! द्या यशोवर्णनीं धीर,
हा बोलवावा दयेनें जसा कीर.
याला म्हणा आत्मदासांत 'ये, सीर; '
पावो पर क्षित्र मोहाव्धिचें तीर.

- मोरोपंतकृत 'स्मरणी. '

 वामनपंडित व मुक्तेश्वर या दोन महाराष्ट्र कविश्रेष्ठांवर निबंध लिहिल्यावर, आज आम्ही तुकारामत्रोत्रा या संतकवीवर प्रबंध लिहिण्याचें साहस करीत आहों. पूर्व निबंधांतील विषय प्रस्तुत निबंधांतील विषय, यांमध्ये स्वरूप, महत्त्व व गांभीर्थ, यांसंबंधाने स्वभावतःच जमीनअस्मानाचे अंतर आहे. वामन- पंडित व मुक्तेश्वर हे दोन्ही विद्वान् व शास्त्राध्यापन मंडित ब्राह्मण कत्री आहेत, तर तुकारामत्रोवा हे ब्राह्मणादि चारी उच्चनीच वर्णोना अत्यंत वंद्य झालेले "शूद्रकवी आहेत. हे तिन्ही कवी


 * प्रो. रा. रा. भागवत हे तुकारामबोवांना क्षत्रियकवी समजतात. ('आमची देशी भाषा विद्यापीठ शोभण्यासारखी आहे कीं नाहीं,हे व्याख्यान पहा.) परंतु निरंजनबुवांनी 'केवशचैतन्य कथातरू'च्या सहाव्या अध्यायांत तुकाराम ' जातीचे कुणबी वाणी' होते म्हणून म्हटले आहे. मोरोपंतांनीही तुकारामस्तुतीत 'शुद्रकवन' म्हणून त्यांच्या अभंगांचा उल्लेख केला आहे. तुकाराम स्वतः आत्मचरित्रांत ' याती शूद्रवंश' असें म्हणतात. तसेंच त्यांनीं ' बरा कुणबी केलों । नाहींतरी दर्भे असर्तो मेलों ।' असा आपल्या कुणबीपणाचा निर्देश केला आहे. तेव्हां त्यांच्यावर क्षत्रियत्र बळेच लादणे युक्त वाटत नाहीं..