पान:तुकारामबोवा.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
तुकारामबोवा.

११

'देवाचे पूजा नैवेद्यालागून । विठोबा करिता झाला आपण, ।
तयालागीं संतान । *पदाजी होता जाहला. ॥ २४ ॥
त्या पदाजीचे पोटीं । शंकर जाला भक्तकिरीटी, ।
तयाचे उदर संपुटीं । कान्हया होता जाहला. ॥ २५
त्या कान्हयासी पुत्र । बोल्होबा जाला जगन्मित्र, ।
त्याची पत्नी परम पवित्र । कणकाबाई या नामें ॥ २६
ते उभयतां बहु भलीं, । देवाची सेवा बहुत केली, ।
दैवयोगें संपत्ती वाढली । उदीमव्यापारेंकरूनी ॥ २७


श्री तुकयाची आजी किंवा पणजी, तिची क्रिया केली; ।
सेवक सेवक होतो, हेचि प्रभुजी बहुप्रिया केली. ॥

-- पंढरी माहात्म्य.

 या आर्येवरून असें दिसुन येतें कीं, आमाबाई ही तुकारामबोवांची आजी की पणजी असावी, ह्याविषयीं मोरोपंतांस निश्चयात्मक ज्ञान नव्हतें. परंतु ही बाई तुकारामबोवांची वस्तुतः आजी नव्हती व पण- जीही नव्हती; तर पणजाची पणजी होती, असें 'केशव चैतन्यकथातरु', 'भक्तविजय,' व रा० राजवाडे यांस आढळलेली वंशावळ, यांवरून सिद्ध होतें.
 हरीचा मुलगा विठोबा या संबंधानें पुढील हकीकत महीपतींनी दिली आहे :- विठोबा वयांत आल्यावर त्याला आपले वडील व चुलता है। विठोबाच्या क्रोधामुळे लढाईत पडल्याची हकीकत आईच्या तोंडून समजली. तेव्हां तो आपल्या वडिलार्जित विठोबाच्या देवळांत जाऊन बापास मारल्याबद्दल विठोबाला बोल लावून, सुरी खुपसून आत्मघात करू लागला. तेव्हां देवांनी प्रकट होऊन त्याची समजूत घातली. तेव्हांपासून तो विठोबाचा निःसीम भक्त बनला व पंढरीची वारी नेमानें करूं लागला.
 * ही वंशावळ केशवचैतन्यकथातरूंतून घेतली आहे. ही महीपतीनों दिलेल्या वंशावळीशी तंतोतंत जुळत आहे. रा० राजवाडे यांस मिळा- लेली वंशावळ व वरील वंशावळ यांत काही किरकोळ बाबींत तफावत आहे. ती लक्षांत यावी म्हणून दोन्ही वंशावळी संक्षेपानें पुढे देतो.