श्रीसरस्वती मंदिर.
परचक्र आलें व लढाईच्या धामधुमीत हरि व मुकुंद मारले गेले. नंतर मुकुंदाची बायको सती गेली. हा भयंकर प्रसंग विठोबाचा दृष्टांत अवमानिल्यामुळेंच आपणांवर आला अशी आमाबाईची खात्री झाली. तिच्या मोठ्या मुलाची- हरीची - बायको गरोदर होती; तेव्हां तिला बरोबर घेऊन ती ताबडतोब देहूस आली व पूर्वीप्रमाणें आपल्या कुळदैवताची सेवा करूं लागली. पुढें तिची सून पंढरीस गेली व तेथेंच ती यथाकालीं प्रसूत होऊन तिला मुलगा झाला व त्याचे नांव विठोबा ठेवण्यांत आलें. हा प्रौढ वयांत आल्यावर मोठा प्रेमळ भगवद्भक्त झाला व देवाची भक्ति त्यानें आपल्या आजोबांप्रमाणे चालविली. नंतर,
दुष्काळांत मेला तो त्यांना एकविसाव्या वर्षापूर्वीच झाला होता; तरी मुलगा होण्याचा तो स्वाभाविक काळ मानणे शास्त्रोक्त होणार आहे. तरी त्या काळावर कटाक्ष ठेवून प्रत्येक पिढी २०-२५ वर्षांची धरली म्हणजे विश्वंभरांचा काळ शक १३१५ येतो; व हरि आणि मुकुंद यांची हयात शालिवाहन शकाच्या चवदाव्या शतकाच्या पूर्वा- त पडते. त्यावरून हे दोघेजण विजयानगरच्या कोणातरी राजाच्या पदरीं त्या सुमारास असावेत, असें वाटतें.
*' केशवचैतन्यकथातरु' व ' भक्तविजय' या ग्रंथांत देहूस आल्यापासून आमाबाई व तिची सून यांची हकीकत दिली आहे, त्यांत बऱ्याच किरकोळ बाबतीत फरक आहे. वर दिलेली हकीकत 'केशवचैतन्य- कथातरू'च्या आधारानें दिली आहे. महिपतिबुवा म्हणतात कीं, आमा-. बाई देहूस आल्यावर तिनें आपली गरोदर सून बाळंतपणाकरितां 'नव- लाख्याच्या उंबरास' माहेरीं धाडिली व तिर्ने स्वतः क्षेत्रवास केला. पुढे तिची दृष्टि गेली, पण विठोबांनी सगुणरूप धारण करून तिची शेवटप- यैत खस्त' काढली व तिच्या मृत्यूनंतर तिचें उत्तरकार्यही केलें. बहुधा याच प्रसंगाला उद्देशून मोरोपंतांनी म्हटले आहे.