पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/242

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २९१ ) ॥ ८५० ॥ मावळली खंती । देहीं देहाची विस्मृती ॥ १ ॥ पांडुरं ध्यानीं मनीं । रूप बैसलें लोचनीं ॥ ३॥ न ये कळों दिवसराती । स्वः निद्रा ना जागृती ॥ ३ ॥ निळा म्हणे अखंडता । विठ्ठलरूपीं तादात्म्यता ।। ४ ।। | ॥ ८६१ ॥ दिसे तो चि जनीं वनीं । विहल हृदयीं त्रिभुवनीं ।। १ । लेणें नेसणें भूषणें । विठ्ठल वखें परिधानें ॥ २ ॥ अन्न भोजन उदक पान । विठ्ठल सुषुप्ती शयन ।। ३॥ निळा म्हणे वाचा बोली । विठ्ठल होऊनियां ठेली ॥ ४ ॥

  • ॥ ८६२ ।। भूत भूतात्मा देखती । ठेली जडोनि एकात्मता । नादळे

गुणदोष वार्ता । नमन नम्रता यां अंगीं ॥ १ ॥ धन्य त्यांचे जन्मकर्म । सम नादळे ज्या विषम ॥ गळोनियां क्रोध काम । झाले निष्काम निभ ॥ २॥ संकल्प नासले विकल्प । पुण्य कैंचें तयो पाप ॥ ठेलें स्वरूप स्वरूप । विठ्ठल रूप विठ्ठल ॥ ३ ॥ अहंकार नुरे उरीं । झाले व्यापक चराचरी ।। निजानंदाची उजरी । सन्मुख तयां सर्वदा ॥ ४ ॥ निळा ह्मणे स्थैर्य बुद्धी । निद्रेद्र झाले निजात्मसिद्धी ॥ सच्चिदानंद पदोपदीं । कैवल्य सुखें दुल्लतो ॥ ५ ॥ |॥ ८५३बोलणे त्याचें तें निःशब्द । देखणें देखती सच्चिदानंद ॥ करणें चाळितां आत्मबोध । विषय विषय ब्रह्मरूप ॥ १॥ जाणे येणे आणिक दिसे । अचळपणे ते जैसे तैसें ॥ कल्लोळ सागरी उससे । रश्मि जैसे निज विवीं ॥ २ ॥ न मोडे या अखंडता । घेतां देतां सर्व ही करितां । हसत खेळती बोलतां । निजी निजतां यथा सुखें ॥ ३ ॥ लेणी अळंकाहि मिर- विती । जयापरि तैसे चि दिसती । न मोडत स्वरूप स्थिती । चित्त चिंतन सर्वदा ॥ ४ ॥ निळा ह्मणे गुणातीत । देहीं देहाते नातळत ॥ होउनियां ठेले संत । अखंडित अखंड ।। ५ ।। ॥८५४ ॥ अखंडता ते झाली ऐसी । विठ्ठल राहिला मानसीं ।। ध्यानीं मन लोचनासी । अहर्निशीं निज बोध ॥ १ ॥ जनीं वनीं जनार्दन । नाढळे त्या भिन्नाभिन्न ॥ एकात्मता अनुसंधान । नित्य दर्शन विठ्ठलीं ॥ २ ॥ देही असोनी देहातीत । गुण गुणातें नातळत ॥ विषय विषयापासुनी मुक्त । भोगी भोगासक्त नव्हती ते ॥ ३ ॥ नित्य निरामय निर्गुण । जग- दात्मा जो आनंदन । विटेवरी पाउलें समान ।