पान:तीन तत्वज्ञानी.pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तीन तत्त्वज्ञानी.

आपल्या योजनेला सर्वांची अनुमति मिळविली, व वालपोलच्या अटकळीबाहेर बार्क्लेच्या योजनेला यश येत चालले. सनद देण्यासंबंधी व विद्यापीठाच्या घटनेसंबंधी व पैशाच्या मदतीसंबंधी ठराव पार्लमेंटांत पास झाले व चार वर्षांच्या खटपटीने आपली योजना मूर्त स्वरूप धारण करणार म्हणून बार्क्लेला मोठा आनंद झाला. आपल्या नव्या लोककल्याणाच्या कामगिरीवर जाण्यापूर्वी बार्क्लेने एका सुशील मुलीशी विवाह करून घेतला, व मोठया हुरुपाने १७२८ साली तो प्रथमतः रोडबेटांत जाण्याकरितां जहाजावर चढला.

आपल्या विद्यापीठाला सनद मिळण्याचे आणि वार्षिक वर्गणी मिळण्याचे सरकाराकडून आश्वासन मिळाले, आणि लोकांनीहि चागला आश्रय देण्याचे कबूल केले, तेव्हां आतां कोणतेंहि विघ्न राहिले नाहीं. असें बार्क्लेला वाटले. पण बार्क्लेसारख्या सरळ, उत्साही व परोपकाररत पुरुषाला व्यवहारज्ञ, कुटिलनीतिनिपुण आणि स्वार्थी मुत्सद्यांच्या धोरणी वर्तनाचे बीज कसे कळावे ? बार्क्ले रोड बेटांत जाऊन पोहोंचला. तेथली एकंदर सृष्टिशोभा आणि परिस्थिति पाहून आपल्या पहिल्या योजनेपेक्षा येथेच विद्यापीठ काढणे चांगले, असे त्याला दिसून आले. पण सरकारी वीस हजार पौंडांची मदत येण्याची तो वाट पहात होता. वोलपोलच्या मनांत बार्क्लेच्या योजनेबद्दल मुळीच आस्था नव्हती. राजाच्या मर्जीविरुद्ध जायाचे नाही, म्हणून तो विरुद्ध नव्हता, इतकेंच. पण तो कोठावळा होता ! प्रत्यक्ष पैसे देणे त्याच्या हातांत होते. जेव्हां बार्क्लेच्या मित्रांनी वालपोलला पार्लमेंटमध्ये पसार झालेल्या ठरावाप्रमाणे पैसे देण्याबद्दल तगादा लावला, तेव्हां त्याने दिलेले उत्तर लक्षात ठेवण्यासारखे आहे. तो म्हणाला "प्रधान या नात्याने जर तुम्ही मला प्रश्न विचारीत असाल, तर मला असे म्हटलेच पाहिजे. आणि मी खातरीने म्हणेन, की, सरकारी खजिन्याला सवड झाल्याबरोबर पैसे दिले जातील ! पण वीस हजार पौंडांच्या देणगीच्या भरवशावर डीन बार्क्लेने अमेरिकेत राहावे किंवा नाही, असे जर मित्रत्वाच्या

६४