पान:तीन तत्वज्ञानी.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तीन तत्त्वज्ञानी.

सर्व जगाचे-सुदैव की, साक्रेटिसाला मरणाची शिक्षा झाली असतांना सुमारे एक महिना त्याला तुरुंगवास भोगावा लागला व यामुळे त्याच्या अंगच्या कित्येक गुणांचे प्रदर्शन झाले. हे तुरुंगांतील दिवस साक्रेटिसाने मोठ्या शांत वृत्तीने व मोठ्या आनंदांत घालविले. या दिवसांत त्याने आपल्या आजन्मव्यवसायाला खळ पडू दिला नाही. तुरुंगांत त्याच शिष्य व परकीय लोक येत व त्यांच्याशी निरनिराळ्या विषयांवर वादविवाद करीत. असा क्रम थेट त्याच्या मरणाच्या क्षणापर्यंत चालला होता. शिक्षा झालेली असूनहि आपले कर्तव्यकर्म करीत असतांना साक्रेटिसाला मरण आले हे त्याचे केवढे भाग्य ! असें भाग्य फारच थोड्यांच्या वाट्यास येते. असो.

 डेलॉस या बेटावर असलेल्या डेलफॉय देवावर अथोनियन लोकांची फार भक्ति होती. ते त्या देवाला आपला संरक्षक देवच मानीत. यामुळे दरवर्षी एका विवक्षित वेळी एक स्वतंत्र गलबत नगरातर्फे या देवाच्या पूजेअर्चेकरितां पाठविण्यात येत असे. अथेन्सच्या बंदरांतून हे गलबत सुटल्यापासून परत येईपर्यंतचा काळ- याला सुमारे महिना लागे-पवित्र व धार्मिक मानला जात असे, व या पर्वणींत कोण याहि माणसाला मरणाची शिक्षा दिली जात नसे. साक्रेटिसाच्या खटल्याचा ज्या दिवशी निकाल झाला त्याच दिवशी हे गलबत बंदरांतून हाकारल्यामुळे साकेटिसाची मरणाची शिक्षा ताबडतोब अमलांत आली नाहीं, व या कारणाने त्याला महिनाभर तुरुंगांत काढावा लागला व तो साक्रेटिसाने कशा प्रकाराने घालविला याचे दिग्दर्शन वर आलेच आहे.

 साक्रेटिसच्या तुरुंगवासास जवळ जवळ महिना होत आला असतांना एके दिवशी अगदी पहाटेस साक्रेटिसाचा पूर्वीचा शिष्य व उतारवयांतील मित्र क्रिटो हा तुरुंगांतील साक्रेटिसाच्या खोलीशी आला. परंतु त्याला गाढ झोप लागली आहे असे क्रिटोला समजले. हे पाहून आपल्या गुरूच्या शांत व आनंदी वृत्तीबद्दल त्याला सप्रेम कौतुक वाटले, साक्रोटिस आपोआप जागा झाल्याबरोबर त्याने आपल्या मित्राची विचार

२४