पान:तीन तत्वज्ञानी.pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कँट


अवलंबून नसते. तेथेही मनुष्याची विवेकशक्ति पुढे येते व मनुष्याला आज्ञा करते. म्हणून त्या विवेकशक्तीला सद्सद्विवेकशक्ति म्हणतात.' तूं अमूक मार्गानेच वागले पाहिजे, तुझें अमुक कर्तव्यकर्म आहे' अशी सद्सद्विवेकशक्ति आज्ञा करते. आतां, ही आज्ञा ' तुला लेखक व्हावयाचे असेल तर चांगले अक्षर कर; किंवा तुला सुख पाहिजे असेल तर वासनातृप्ति कर' अशा तऱ्हेची शर्तीची आज्ञा नसते. तर ती बिनशर्त आज्ञा असते. 'विवेकी मनुष्य म्हणून तूं हे केले पाहिजेस, तुझे कर्तव्यकर्म म्हणून हे केले पाहिजेस; फलाशा ठेवून कर्म करतां कामा नये' अशा तऱ्हेची ही आज्ञा असते. अर्थात् अशी आज्ञा पाळणे म्हणजे वासनांना बाजूस सारून केवळ विवेकाचे पाय धरणे होय. ही आज्ञाच सर्व नीतिनिबंधाचा मूळ पाया होय. या बिनशर्त आशेपासूनच सर्व नीतीचे नियम निघालेले आहेत. आतां या आशेचे स्वरूप तरी काय आहे ? अर्थात् या आज्ञेत विशेष वासनांचा समावेश होत नाही, या आशेंत सुखाच्या कल्पनेचे ध्येय येत नाही. ही आज्ञा कर्तव्य म्हणून कर्तव्य करा इतकेच सांगते. तुमचे कर्तव्य कोणतें हैं तुमच्या परिस्थितीवर व समाजांतील दर्जावर अवलंबून राहील. पण तुमचे कर्तव्यकर्म कर्तत्वकर्म म्हणून करा फलाशेने करूं नका इतकेच विवेकाचे म्हणणे आहे. अर्थात् ही आज्ञा सर्व माणसांना लागू आहे. ती सदा सर्वकाळ पाळावयाची आहे. ती एकाला आहे आणि दुसयाला नाही अशांतला भाग नाही; तिला अपवाद टाऊक नाही. एकाच परिस्थितीत जर एका मनुष्याचे एक कर्तव्यकर्म असले तर त्याच परिस्थितीत ते सर्व मनुष्यांचे कर्तव्य कर्म असले पाहिजे असे ती आज्ञा म्हणते. 'तूं अशा तऱ्हेने वाग की तुझ्या वागण्याचे तत्व तुझ्या इच्छेने सार्वत्रिक नियम करतां आल्यास तुझ्या विवेकाला तें तत्व आवडेल ' असे या आज्ञेचे स्वरूप कँटने दिले आहे. याला त्याने नैतिक कायदा म्हटले आहे व सर्व नीतिनियम या कायद्यापासून निष्पन्न होतात असे कँटने दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. उदाहरणार्थ सत्य बोलण्याचा

१११