पान:तीन तत्वज्ञानी.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
तीन तत्त्वज्ञानी.
साक्रेटिस.
इतिवृत्त .


 'जेथे जेथे धूर आहे, तेथे तेथें विस्तव आहे, पर्वतावर धूर आहे, म्हणून पर्वतावर विस्तव आहे.' संस्कृत तर्कशास्त्रज्ञांचे हे ज्याप्रमाणे अनुमानाचे एक आवडते उदाहरण आहे, त्याप्रमाणेच 'सर्व माणसे मरणाधीन आहेत, साक्रेटीस माणूस आहे, म्हणून तो मरणाधीन आहे.' हैं इंग्रजो तर्कशास्त्रज्ञांचे अनुमानाचे आवडते उदाहरण आहे. यामुळे साक्रेटिसाचे नाव आमच्या सर्व सुशिक्षिताच्या अत्यंत परिचचे झालेले आहे हे खरे आहे. पण 'अतिपरिचयादवज्ञा' या म्हणीची सत्यता या ठिकाणी दिसून येते. म्हणजे जरी साक्रेटिसाचें नांव सर्वतोमुखी झालेलें आहे तरी त्याच्याबद्दलची माहिती मिळविण्याची जिज्ञासा आमच्यांतील फारच थोड्यांमध्ये दिसून येते.
 परंतु युरोपांत या पुरुषाची माहिती आबालवृद्धांस आहे. कारण ग्रीक भाषेमध्ये सेनाफन व प्लेटो या दोन ग्रंथकारांनी सॉक्रेटिसाच्या चरित्रावर व विशेषतः त्याच्या मनोरंजक व उपदेशपर संभाषणांवर सर्वमान्य ग्रंथ लिहिले आहेत. यामुळे जोपर्यंत ग्रीकभाषा जिवंत आहे, तोपर्यंत सोक्रेटिसाची कीर्ति अजरामर राहील यांत तिळमात्र संदेह नाही. ही या प्रसिद्ध तत्त्ववेत्त्याला तर आपल्या गुरूबद्दल इतकी विलक्षण पूज्य बद्धि होती, की त्याने आपले तत्त्वविषयक सर्व विचारच मुळी साक्रेटिसाच्या तोंडी घातले आहेत. यामुळे प्लेटो व सॉक्रेटिस हा वाङ्मयांत एक जोड