पान:तिच्या डायरीची पाने.pdf/७०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


कहाणी निर्मलाची


 निर्मला मातोळेबद्दलच्या बातम्या अधूनमधून कानावर येत असतात. ती पुण्याला अमूक कंपनीत काम करते. पगार बरा मिळतो. चुलत भावाच्या घरी राहाते इत्यादी. एक दिवस अचानक त्या कंपनीत तयार होणाऱ्या पदार्थांचे पॅकबंद पुडे घरी आले. सोबत वार्ताही आली की निर्मला संस्थेच्या दिलासा घरात येऊन गेली. कंपनीत तयार होणाऱ्या गुलाबजामून, जिलबी, इडली, इत्यादी पदार्थाच्या पावडरीचे पुडे तिने आणले होते. स्वतः गुलाबजाम तयार करून दिलासा घरातील सर्वाना खाऊही घातले. आणि एकेक पुडा भाभीसाठी, म्हणजे माझ्यासाठी फारफार आग्रहाने पाठवला. मी प्रश्न केला, "निर्मलेला घरी का आणलं नाही? नाहीतर मी आले असते भेटायला. निदान कळवायचं तरी."
 "बाई तुमच्यासमोर यायला संकोच वाटतो पोरीला. शिवाय रात्रीच्या बसनी पुण्याला जायचं होतं. ड्यूटीला हजर राहायचं होतं." गंगामावशींनी मानवलोकच्या मम्मीने सांगितले. ही मम्मी म्हणजे गंगामावशी पवार. मम्मी आणि निर्मला यांचे नाते सख्ख्या मायलेकींपेक्षा जवळचे होते. एक दिवस मम्मींच्या तोंडूनच कळले की संस्थच्या बालसदनमध्ये वाढलेला, थोराड बांध्याचा अनाथ मुलगा बाबू आणि निर्मला पुण्याला एकत्र राहातात. हे सांगताना मम्मींची मान खाली गेलेली. आवाज काहीसा कापरा झालेला. . "काय करावं बाई? आपलंच मीठ आळणी. या पोरींसाठी काय कमी उस्तवाऱ्या केल्या? लातूरला काय कमी खेपा झाल्या? आणि बब्याला तर लहानाचं मोठं केलं. दहावीपर्यन्त ढकलीत आणलं. आन बघा काय वाढून ठिवलं त्यांनी आपल्या ताटात? बाबूपरीस ही पोरगी सात आठ वरसांनी वडील असंल. तरी देखील असं वागावं तिनं? हितंसुद्धा बाबूला जेवण वाढाया लगीबगी उठायची. त्याच्यासाठी चांगलंचुंगलं

निर्मला
६५