पान:तर्कशास्त्र.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग पहिला. ३१ होऊन त्यापासूनच ' जातिज्ञान ' झालें आहे. ' कावळा ? या जातीचें ज्ञान होण्यापूर्वी मुलास ' कावळा? या व्यक्तीचें ज्ञान व्हावें लागतें; व एक दोन तीन असे बरेच कावळे पाहिल्यानंतर त्यास ' कावळा' या वर्गाचें जातिज्ञान होतें. ह्मणजे “ कावळा ? या वर्गाचें ' जातिज्ञान ? होण्यापूर्वी त्या वर्गात येऊं शकणा-या व्यक्तींचें ज्ञान होणें अवश्य आहे. याचप्रमाणें इतर सर्व जातिज्ञानांतही समजावें. सर्व व्यक्तींमध्यें कांहीं समानगुण आहेत अशा दृष्टोर्न जै त्या व्यक्तींचें ज्ञान तैच जातिज्ञान हाय. २३. दुसरा नियम,-व्यक्तींना जर अस्तित्व असेल तर जातीलाही अस्तित्व आहे, आपल्या समोर आपण कांहीं झुडुपें पाहतों, व त्या सर्वांचा आकार व रचना सारखींच आहेत, व सर्वांनांही कांटे आहेत असें पाहून ' काटेरी झाडें? असा त्यांचा एक वर्ग आपुण करितीं. आतां येर्थ आपण काय ह्मटल्यासारखें झालें, कीं जर प्रत्येक झुडुपाला अस्तित्व असेल तर त्यांच्या जातीलाही आहे. जातीला जें अस्तित्व आहे तें त्या झुडुपांत व त्यांच्या समानगुणांतच आहे. व्यक्ती जर केवळ काल्पनिकच असतील तर त्यांची जातिही काल्पनिकच राहणार. भुतें व वनदेवता यांना जर अस्तित्व नाही असें मानलें, तर त्यांच्या वर्गालाही अस्तित्व आहे असें ह्मणतां येणार नाहीं. तात्पर्य हैंच कीं, एकाद्या वर्गाला अस्तित्व आहे किंवा नाहीं याचा निर्णय करणें झाल्यास, त्या वर्गीतील व्यक्तींस, व वर्गीकरणास साधनीभूत