पान:तर्कशास्त्र.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६ तर्कशास्त्र, १७. दुसरी पायूरी-कोणकोणत्या बाबुर्तीत सूस्य आहूह आपणू कमी किंवा अधिक निश्चयानें ठरवितें. ही क्रिया ह्मणजे निष्कर्षांचाच एक विशिष्ट प्रकार आहे. w बरेच वेळां, हा निष्कर्ष फार अव्यवस्थित प्रकारचा असतो, ह्मणजे समानधर्म कोणचे आहेत याची स्पष्टपणें व्याख्या आपण मुळीच केलेली नसते. कांहीं पदार्थीच्या रंगांत, आकारांत किंवा . धर्मात एक ठोकळ साम्य । आहे असें आपण पाहतों. परंतु कोणत्या विवक्षित गेोष्टींत | साम्य आहे असा, आपण स्वतःच किंवा दुस-यानें, जर आपणास प्रश्न केला तर त्याचें उत्तर आपणास देतां येणार नाही. जेथें निष्कर्षांची अशी अव्यवस्था नसते तेथें, विशेषतः सृष्टपदार्थशास्त्राच्या वर्गीकरणांत, साम्याच्या बाबी बरोबर निश्चित केलेल्या व स्पष्टपणें सांगेितलेल्या असतात. या भूतलावर जे जे चुकीचे विचार व असमाधानकारक वाद चाललेले असतात त्यांचें पुष्कळ अंशीं खरें कारण हैं आह कीं, ज्या समानधमीच्या येोगानें पदार्थाचा एक वर्ग होऊन त्यांचें आपणास ' जातिज्ञान? होतें, ते समानधर्म कोणते, याचा आपण कधींच बरोबर निश्चय केलेला नसतो. सर्व प्रकारचें ' जातिज्ञान ? समान धर्माच्या योगानें होतें असें तर्कशास्त्र दाखवितें, व ते समानधर्म कोणचे हैं आपणास स्पष्टपणें समजून घेण्यास लावितें, व अशा रीतीनें आपणास योग्य विचार करण्यास मदत करितें. या समानधर्मास तर्कशास्रकारांनीं ' विशिष्ट चिन्ह ।' अर्से नांव दिलें आहे. -