भाग पहिला, ૨. येोगानें, व ज्या असंख्य बारीकसारीक गोष्टी नुसत्या ध्यानांत ठेवणें बिकट होणार त्यांचे सुबोध व सोईचे असे । निरनिराळे वर्ग करणें हें अत्यावश्यक झाल्यामुळे अशा तीन कारणांनीं मनाला साम्य शोधून काढणें भागच पडतें. आतां वर्गीकरणक्रियेस सुरुवात कशी होते याचा विचार करूं. १६. पहिली पायरी-ज जे पदार्थ आपल्या दृष्टीस पडतात त्यांत, कमी किंवा अधिक स्पष्टतेनें, एक प्रकारचें साम्य आपण पहात असतों, या क्रियेचें नांव तुलना. लहान वयातच या क्रियस आरभ हाता. मनुष्य प्राणी व इतर प्राणी, पुरुष व स्त्री, लहान व थोर, यांमधील भेद, सादृश्याच्या योगानें, मुलास लवकरच समजूं लागतात. तसेंच पक्षी कशास ह्मणावें, मांजर, कुत्रा, शेळी किंवा घेोडा कशास ह्मणावें, हेंही व्यवहारांत उपयोगी पडेल इतक्यापुरतें त्यांना कळू लागतें, परंतु अशा माण्यांशीं त्या मुलांचा नेहमीं सहवास मात्र घडत असला पाहिजे. आपल्या दृष्टीस प्डणाया गोष्टींत व पदार्थीत साम्य शाघून काढण्याकड सव आयुष्यभर आपल्या मनाचा कांहीं अंशीं कलच असती व कांहीं अंशीं तसें करणें आपणास भागच पडतें. कांहीं सादृश्यें व्यवहारोपयोगी असतात, व तीं पहाणान्यास त्यांपासून दूरदर्शित्व व शहाणपण येतें. कांहीं सादृश्यें मानसिक किंवा शास्त्रीय उपयोगाचीं असतात, व तीं सृष्टपदार्थीचे परस्परसंबंध मोठ्या विस्तारानें दाखवितात. कांहीं सादृश्यें केवळ भाषासंबंधी असतात, व त्यांपासून उपमा, रूपक इत्यादि. अलंकार उत्पन्न होतात. R
पान:तर्कशास्त्र.pdf/51
Appearance