पान:तर्कशास्त्र.pdf/194

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६६ तर्कशास्त्र एकंदर तीन सिद्धांत आढळतात. परंतु या ठिकाणीं असा एक प्रश्न उद्भवती कीं, या प्रतिज्ञा आपणांस कोटून मिळतात ? याचें उत्तर हेंच आहे कीं, त्या आपणांस उपजत बुद्धीनें *िवा अनुभवानें समजतात. कांहीं प्रतिज्ञा अशा असतात कीं, केवळ उपजतबुद्धीनें पदार्थीचें जें तात्कालिक ज्ञान आपणांस होतें त्याच्या योगानेंच त्याकरितां येतात. उदाहरणार्थ, ( १ ) दोन समांतर रेषा कितीही लांब वाढविल्या तरी त्या एकमेकांस कधीही मिळावयाच्यू नाहीत, (२) दोन सरळ रेषा कोणतीही ज़ागा पूरिवेष्टित करू शुकणार नाहींत, किंवा (३) इश्वराशा कृतक्षपणा करण व मनुष्यमात्रावर निंदयता दाखविणें हें पाप होय, हें आपणांस उपजतबुद्धीनेंच समजतें. हीं स्वतःसिद्ध वचनें आपणांस अनुमानपद्धतीनें शेधून काढावीं लागत नाहीत; केवळ पदार्थविषयीं विचार केल्यानेंच या गोष्टी ख-या आहेत असें आपणांस समजतें. परंतु याहून पुष्कळच अधिक प्रतिज्ञा निवळ व्यवहारिक अवलोकनानें आपणांस कारतां येतात, व सामान्य सिद्धांत संगृहीत अवलोकनानें आपणांस कळतात. विस्तव जवळच्या पदार्थीस जाळतो, सर्व वस्तू एकमेकांस आकर्षण करीत आहेत, प्राणी व वनस्पती यांस पोषणाची जरूर असते, प्राणी इतर सेंद्रिय पदार्थीवर आपली उपजीविका करितात, इत्यादि सिद्धांत आपणांस याच रीतीनें समजतात.
५७ हें संगृहीत अवलोकन मनुष्यानें स्वतंत्रपणें केलेलें असेल, किंवा इतरांच्या एकत्र केलेल्या अनुभवांच्या सहा