पान:तर्कशास्त्र.pdf/183

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग तिसरा. ՀԿԿ यावरून असें दिसेल कीं, एकंदरीत संविभागी अनुमान व शुद्ध स्वार्थी अनुमान या दोहोंचें नियामक तत्व एकच आहे. स्याद्वाद किंवा उभयसंभव, ४९. कधीं कुर्थी आपल्या मनांत आपोआप उत्पन्न होणारे विचार असे असतात कीं, त्यांत संविभागी प्रति ज्ञांपासून आपण एक निगमन काढीत असतों, किंवा पर्वायसिद्धांतांपैकीं कोणता सिद्धांत पसंत करावयाचा याचा निर्णय केल्याशिवायच एक संविभागी निगमन काढीत असतों, व अशा वेळीं त्या अनुमानाला स्याद्वादाचें रूप येतें. स्याद्वादांतील एक प्रतिज्ञा संकेतार्थी असते, व तींतील पूर्वगामी किंवा आनुषंगिक सिद्धांत संविभागी असतो; व था संविभागी सिद्धांतांत सांगितलेल्या पर्यायाहून निराळा पर्याय कधीही शक्य नाहीं, असें दुस-या प्रतिज्ञेत प्रतिपादन केलेलें असतें; व अशा या दोन प्रतिज्ञांपासून आपण एक निगमन काढतों, जर्स, (१) महत्प्रतिज्ञा. कोणत्याही एका गोष्टीला उपाय करणें मनुष्याच्या स्वाधीन असेल तर त्या विषयीं त्यानें धुसफुसूं नये. जर कोणत्याही एका गोष्टीला उपाय करणें मनुष्याच्या स्वाधीन नसेल तर त्या विषयी त्यार्ने धुसफुसू नयो. अल्पप्रतिज्ञा. परंतु कोणत्याही गोष्टीला उपाय करणें त्याच्या स्वाधीन असेल किंवा नसेल. .’, त्यार्ने त्याविषयीं घुसफुसू नये.