पान:तरंग अंतरंग.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गहन प्रश्न रोह्याला असताना सुभाषमुळं आमची आणि कुलकर्णी कुटुंबाची दोस्ती झाली. त्यांची लाकडाची वखार होती. भलीमोठी लाकडं कापून फळ्या करण्याचे काम त्यांच्याकडे दिवसभर चालत असे. त्यांच्यातल्या आमच्याच वयाच्या सुधाकरशी आमची जरा जास्तच घसट होती. असंच एकदा मी, सुभाष व सुधाकर गप्पा मारता मारता 'सशाचं मटण भयंकर भारी; पण गरम असतं,' अशी माहिती सुधाकरने पुरवली. मला 'ते' गोंडस, लाल, चुटुक डोळ्यांचे ससे ही मारून खायची गोष्ट आहे, याचा पत्ताच नव्हता. मी विचारलं, "ससे बाजारात विकायला येतात काय कोंबड्यासारखे ?" मोठ्यानं हसत सुधाकर म्हणाला, "मी शिकार करून आणतो. थांब जरा, आलोच" असं म्हणून आतून डबलबारी बंदूकच दाखवायला घेऊन आला. जयंतराव पुण्याहून आमच्याकडं येतात, तेव्हा अधून-मधून आम्ही शिकारीला जातो. मला प्रचंड कुतूहल निर्माण झालं. "चल, आपण पण जाऊ शिकारीला." तो हसला आणि म्हणाला, "या दिवसांत नाही. एक-दोन महिने थांबा. वालाला शेंगा लागून त्याचा घमघमाट सुटला की ससे त्या शेंगा खायला बाहेर पडतात, मग आपण शिकारीला जाऊ.' 11 दोन महिन्यांनी अखेर तो दिवस उजाडला. उठल्या उठल्या चहा घेतला. "थोडा ब्रेकफास्ट करून जावा...' " असं बायको म्हणत होती. पण "नाही, नाही. अगं, आज माझा स्वयंपाकही नको करूस. आम्ही शिकारीला जाणार, तेव्हा सशाचं खास जेवण आहे." असं गडबडीत बेत सांगून मी बाहेर पडलो. मी, सुभाष मोकळ्या हाताने व बंदूक घेऊन सुधाकर आणि चौथा म्हाद्या न्हावी असे आम्ही शिकारीला निघालो. मला म्हाद्याला बघून जरा आश्चर्य वाटलं. 'म्हाद्याचं शिकारीला काय काम?' मनात विचार आला सशाला भादरायचं काम त्याच्याकडं असावं. जसं जंगलात शिरलो, तसं कळलं हा म्हाद्याच तर मेन माणूस, वाटाड्या आहे. याला प्रत्येक जंगली प्राण्यांची हालचाल आणि एवढ्या मोठ्या जंगलाचा कानाकोपरा, इंच न् इंच ठाऊक होता. "बोलू नका, " असे आमच्या दोघांवर ओरडून म्हाद्यानं एकदम 'वरात' थांबवली. "हा बघा वाघ..." वाघ एवढं ऐकून आम्ही सटपटलोच ! एकदम काही निरीक्षण करत म्हाद्या खाली बसला, तसे आम्हीपण खाली बसलो. मनात आलं, वाघानं उडी टाकलीच तर डोक्यावरून जाईल म्हणून बसला असावा. तर बसून तो एका काळ्या बारक्या वाटोळ्या दगडासारख्या छोट्या समूहाकडे अगोदर थोडं डोकं खाजवत बोट दाखवून म्हणाला, "इथं वाघीण हाग लिया. ' " आम्हाला हसू आवरेना. या खेपेला म्हाद्याने डोळे वटारले आणि तो सुधाकरला म्हणाला, 'या दोघांना अगोदर चूप करा शेठ, न्हाय तर शिकार काय घावत नाय. " सुधाकरनं आम्हाला सशाचे कान फार तीक्ष्ण असतात, तेव्हा तोंडावर बोट ठेवून तरंग अंतरंग / १०६