पान:डी व्हँलरा.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बंडखोराला जन्मठेप २५ देहांत शिक्षा ठोठावण्यांत आली. पण पुढे ही देहांत शिक्षा कमी करून जन्मठेपेची शिक्षा त्याला सांगण्यांत आली. असे कां झालें तें नक्की सांगवत नाहीं. कदाचित् जन्मानें तो अमेरिकेचा नागरिक होता म्हणून तसे झाले असेल, किंवा त्याच्या अगोदर कित्येक लोकांना भराभर देहांतशिक्षा ठोठावल्याबद्दल सान्या आयलंडभर सरकारविरुद्ध एकच हाकाटी झाली असल्यामुळे ती शिक्षा देण्याचे सरकारने बंद केलें असेही असेल, शिक्षा झाल्यानंतर ताबडतोब इतर शेंकडों कैद्यांच्या बरोबर डी व्हॅलेराची इंग्लंडला रवानगी झाली, व त्याला लुई येथील तुरुंगात टाकण्यांत आले. आयर्लंडच्या स्वातंत्र्यासाठी डी व्हॅलेराने केलेल्या पहिल्या झटापटीचा शेवट असा झाला. डी व्हॅलेरा पराभूत होऊन बंदिखान्यांत पडला ! पण दैवाच्या चक्राला लवकरच उलटी गति मिळावयाची होती, आणि डी व्हॅलेरा स्वतंत्र होऊन त्यांच्या हातून आयरिश स्वातंत्र्याचा झेंडा आणखी उंच फडकविला जावयाचा होता ! डी.१...अ.