पान:डी व्हँलरा.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४ । डी व्हॅलेरा शत्रूचा गैरसमज होईल अशी त्याने व्यवस्था केली. लवकरच शत्रूच्या तोफा गर्जू लागल्या व त्या इमारतीवर गोळे पडू लागले. अल्पावकाशांत इमारत उध्वस्त झाली, व अशा प्रकारे स्वतः ज्या इमारतीचा नाश करणे शक्य नव्हते तिचा शत्रूकडूनच डी व्हॅलेराने युक्तीने उच्छेद करविला. { पण दुर्दैवाने डी व्हॅलेराच्या युक्तीचा व शौर्याचा उपयोग झाला नाहीं. बंड अयशस्वी ठरले आणि शस्त्रे खाली ठेवून शरण जाण्याबद्दल बंडाचे पुढारी पिअर्स यांनी बंडवाल्यांना हुकूम सोडले. सगळ्या अधिका-यांच्या मागून डी व्हॅलेराने एप्रिलच्या ३० तारखेला शस्त्र खाली ठेवले. त्या वेळीं देखील त्याच्या हाताखालचे लोक ताजेतवाने व लढण्यास उत्सुक होते, ज्या जागीं तो होता ती जागा त्याने पूर्णपणे आपल्या हाती टेविलेली होती, आणि लढाई पुढे चालू ठेवण्याची त्याची फार इच्छा होती. रविवार ता. ३० रोजी सकाळी शस्त्रे खाली ठेवण्याबद्दल पिअर्सकडून जेव्हां निरोप आला तेव्हा त्याला प्रथम तो खराच वाटेना. कोणी तरी आपल्याला फसविण्यासाठी ही युक्ति योजिली आहे अशी त्याला शंका आली. पण शोधाअंतीं तो निरोप पिअर्सकडूनच आला होता अशी त्याची खात्री पटली. मग तो हुकूम मान्य करणे त्याला भाग होते. मात्र शस्त्रे खाली ठेविल्यानंतर आपल्या सैनिकांना योग्य तव्हेने वागविण्यांत आले पाहिजे अशी त्याने जोराची मागणी केली. शस्त्रे ताब्यात घेणा-या अधिका-याला तो म्हणाला, १६ माझे तुम्ही काय वाटेल ते करा. पण माझ्या शिपायांच्या केसाला धक्का लागतां कामा नये ! ते वाक्य उच्चारतांना डी व्हॅलेराने इतक्या ऐटीने त्या अधिका-याकडे पाहिले, की तिहाइताला वाटले असते डी व्हॅलेराचाच जय झालेला आहे, व पराजित शत्रूकडील माणसाशींच तो बोलत आहे ! बंडांत सामील झाल्याबद्दल डी व्हॅलेराची चवकशी झाली व त्याला