पान:डी व्हँलरा.pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९४ डी व्हॅलेरा

      • आयर्लंडच्या रहिवाशांनो, | ग्रेट ब्रिटनशीं होऊ घातलेल्या तहाचा मसुदा वर्तमानपत्रांतून तुमच्या वाचण्यांत आलाच असेल. गेल्या तीन वर्षांतील प्रत्येक निवडणुकीच्या वेळी देशांतील बहुमताच्या ज्या इच्छा स्पष्टपणे दिसून आल्या त्यांच्याशी या तहाच्या कलमांचा पूर्ण विरोध आहे. असला तह मान्य करण्याविषयीं डेल आयरेनला किंवा राष्ट्राला शिफारस करावीसे मला वाटत नाही, हे सर्वांस ताबडतोब कळविणे हे माझे कर्तव्य आहे असे मी समजतों. माझ्याप्रमाणेच आपले गृहमंत्री ऑस्टिन स्टॅक व संरक्षण मंत्री कॅथल ब्रूघा यांचे मत आहे. पुढच्या बुधवारी ११ वाजता डेल आयरेनचे जाहीर अधिवेशन व्हावयाचे ठरत आहे. मध्यंतरीं सान्या लोकांनी पूर्वीप्रमाणेच शिस्तीचे वर्तन कायम ठेवावे. डेलच्या कार्यकारी मंडळांत जरी मतभेद असले तरी पूर्वीप्रमाणेच सर्व सभासदांनी आपली कामें चालवावी असे ठरले आहे. सैन्याची व्यवस्था अर्थात् जशीच्या तशी पूर्वीच्या अधिका-यां- च्याच हुकमतींत राहील. लोकांच्या ख-या कसोटीची वेळ आतां आली आहे. द्वेषबुद्धि मनांत न ठेवतां, आणि शिव्याशापांनीं तोंड न विटाळतां या प्रसंगाला आपण सर्वांनीं तोंड दिले पाहिजे. आपले राजकीय मतभेद मिटविण्याचा रीतसार मार्ग स्पष्ट दिसण्यासारखा

आहे. त्या मार्गापासून आपण भ्रष्ट होता कामा नये, आणि या बाबतींत डेल आयरेनच्या कार्यकारी मंडळाचे वर्तन साच्या लोकांनी आदर्शवत् मानले पाहिजे. इमॉन डी व्हलरा.” ज्या तहाचा विचार करण्याकरितां डेल आयरेनचे जाहीर अधिवेशन व्हावयाचे होते त्या तहांत मुख्य मुख्य कलमें अशीं होतीं, की:-- । ( १ ) कानडा, ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड यांसारखीच साम्राज्यांतर्गत मान्यता आयलंडला असावी. आयरिश लोकांविषयी कायदे