पान:ज्योतिर्विलास.pdf/4

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अथवा विद्यमान कर्त्यांचा अथवा त्यांच्या प्रकाशकांचा मी फार आभारी आहे. या पुस्तकांतले नक्षत्रपट तयार करण्याच्या कामी रा०रा० गणेश सखाराम खरे, सुपरवायझर, इरिगेशन डिपार्टमेंट खानदेश यांचे फारच साह्य झाले. तसेंच रा० रा० परशुराम लक्ष्मण दातार निसबत कुलाबा वेधशाळा यांनी वेळोवेकी तारादिकांसंबंधे पुष्कळ माहिती दिली. या उभय गृहस्थांचा मी फार आभारी आहे. इंग्रजी पारिभाषिक संज्ञांबद्दल मराठीत काही नवीन शब्द योजावे लागले. व काही मराठीत मुळीच किंवा फारसे प्रचारांत नाहीत परंतु संस्कृत ग्रंथांत आहेत ते घेतले आहेत. त्यांची यादी पुढील पृष्ठावर दिली आहे. या पुस्तकांत कोणत्याही प्रकारे सुधारणा करण्यासारखी काही स्थळे कोणास वाटतील ती त्यांणी मला कळविल्यास मी त्यांचा फार आभारी होईन. ज्योतिःशास्त्राचे थोडेबहुत ज्ञान प्रत्येकास असतेच. तथापि या पुस्तकापासून काहीतरी वाचकांच्या ज्ञानास थोडीबहुत भर पडली किंवा पुष्टि आली तर आपण आपले कर्तव्य अंशतः तरी केले असें वाटून मला समाधान होईल. धुळे, ता० २३ सप्टेंबर १८९२. शंकर बाळकृष्ण दीक्षित. सूचना. पहिल्या आवृत्तीत राहिलेल्या चकांची व काही नवीन दुरुस्ती ग्रंथकर्त्यांनी लिहून पाठविली त्याप्रमाणे ही दुसरी आवृत्ति छापली आहे. आणि प्रथमच्या खचाच्या काही बाबींचा फायदा ह्या वेळी मिळाल्यामुळे प्रस्तुत आवृत्तीचे बाइंडिंग उत्कृष्ट बनविले आहे. पहिल्या आवृत्तीचे वेळी लोकाश्रय चांगला मिळाला व हा ग्रंथ सर्वत्र प्रिय झाल्याचे ग्रंथकांस व मला कळले ह्यामुळे आपापल्या कृतीविषयी उभयतांस समाधान वाटले. अशा प्रकारच्या ग्रंथांना सरकारचा आश्रय मिळणे अगदी इष्ट आहे व तो ह्या आवृत्तीपासून ह्या ग्रंथाला मिळेल अशी पूर्ण उमेद आहे. पणे, पेठ शनिवार, घर नंबर ३४.? बळवंत गणेश दाभोळकर. तारीख ५ फेब्रुआरी सन १८९३.S (प्रकाशक.) उभयतांस समाझाल्याचे संबया आवृत्तीचे काल्यामुळे प्रस्त