पान:ज्योतिर्विलास.pdf/198

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८२ ज्योतिर्विलास. चवथ्या प्रतीची होते. सुमारे १५ मिनिटें तशीच राहते. व पुन्हां ३॥ तासांत पूर्ववत् होते. भरणी आणि कृत्तिका ह्यांच्या उत्तरेस ती आहे. ह्या तिही मिळून एक काटकोनत्रिकोण होतो. त्याचा काटकोनबिंद भरणीत आहे. अलगोल तारा जानुआरीच्या २० व्या तारखेस सात वाजतां मध्यान्हीं येते. आक्टोबर पासन चार पांच महिने तिचा रूपविकार पाहण्याची संधि चांगली असते. ह्या (इ० स. १८९३) वर्षी जानुआरीच्या १७ व्या तारखेस मद्रासटाइम सवासात वाजता हिचें तेज अगदी कमी झाले होते. या वरून पुढील वेळा सुमाराने काढितां येतील. हिचा व्यास सुमारे ११ लक्ष मैल आहे. हिच्यापासून तीन लक्ष मैलांवर ८ लक्ष मैल व्यासाची दुसरी एक तारा हिच्या भोवती फिरते. यामुळे हिच्या तेजांत फेरफार होतो. ह्या रूपविकारांत थोडा अनियमितपणा दिसून आला आहे. त्यावरून आकर्षणनियमानें गणित करून एका ज्योतिष्याने नुकतेच अनुमान केले आहे की, ह्या दोन्ही तारा सुमारे १३० वर्षांत त्यांहून फार मोठ्या दुसऱ्या एका तारे भोंवती फिरतात. ती तारा दिसत नाही व तिला प्रकाश नाही. मिरा ( अद्भुत) या नांवाची दुसरी एक रूपविकारी तारा तिमिंगल पुंजांत आहे. इ० स० १८९३ च्या आरंभी तिचे विषुवांश २।१३।५६ आणि क्रांति द ०3/२७४९ आहे. ही जानुआरीच्या ८ व्या तारखेस सात वाजतां मध्यान्हीं येते. हिचा रूपविकारकाल सुमारे दहा बारा महिने आहे. त्यांत कांही दिवस ती नुसत्या डोळ्यांनी दिसत नाही. पुढे दिसू लागली म्हणजे सुमारे चाळीस दिवसांत दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रतीची होते. मग सुमारे दोन महिन्यांत पूर्वावस्था पावते. नौकापुंजांत तिसरी एक तारा आहे. १८९३ च्या आरंभी तिचे विषुवांश १०॥४०॥५५ आणि द० क्रांति ५९/७/१५ आहे. मेच्या १७ व्या तारखेस ही ७ वाजतां मध्यान्हीं येते. हिच्या तेजांत फार विलक्षण फेरफार होतो. परंतु त्याचा काल सुमारे ४६ वर्षे आहे. इ. स. १८३७ पासून ५।६ वर्षे ती पहिल्या प्रतीची झाली होती. त्यांत १८४३ मध्ये तर व्याधाच्या खालोखाल दिसत होती. पुढे कमी होऊं लागून १८६७ मध्ये तर नुसत्या डोळ्यांनी बहुधा दिसेनाशी झाली. इतर तारांचे फेरफार पुष्कळ होतात. परंतु त्या बारीक असतात. अभिजितच्या आग्नेयीस ५६ अंशांवर दोन तारा आहेत. त्यांतली पश्चिमेकडची १३ दिवसांत ४ वेळां बदलते. त्यांत कधी ३॥ प्रतीची व कधी ४|| प्रतीची असते. मृगांतली १३ वी तारा किचित् बदलणारी आहे. . नव्या तारा:-कधी कधी पूर्वी दिसल्या नाहीत अशा फार प्रदीप्त तारा आकाशांत दिसतात, आणि नाहीशा होतात. इ० स १५७२ च्या नोव्हेंबरपासून सुमारे १६ महिने वृषपर्वा व शर्मिष्ठा ह्यांच्या मध्ये एक प्रदीप्त तारा दिसत होती. त्यांत पाऊण महिना तर ती फारच प्रदीप्त होती, व दिवसास दिसत असे. इ. स० १६०४ च्या सप्टेंबरपासून १६ महिने भुजगधारीमध्ये एक तारा दिसत होती. सुमारे पाऊण महिना ती शुक्राच्या खालोखाल होती. सन १८६६ मध्ये उत्तरमु