पान:ज्योतिर्विलास.pdf/175

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

युरेनस आणि नेप्चुन्. १५९ टनाच्या शोधापेक्षाही हा शोध एका अर्थी अधिक कठिण आहे असे म्हटले असतां चालेल. ग्रहगतिस्थितीचे गणित सांप्रत कसे पूर्णावस्थेस आले आहे हे ह्या शोधावरून दिसून येते. नेपचुन् (वरुण) हा ग्रह सूर्यमालेत शेवटचा आहे. याच्या पलीकडे आणखी ग्रह असेल असा संभव दिसत नाही. हा सूर्यापासून सुमारे २७७ कोटी मैल म्हणजे पृथ्वीच्या ३० पट अंतरावर आहे. त्याचा व्यास ३४॥ हजार मैल आहे; आकार पृथ्वीच्या ८३ पट, व द्रव्य पृथ्वीच्या १७ पट आहे. त्याचे वैरल्य पृथ्वीच्या पंचमांश म्हणजे पाण्याहून किंचित् जास्त आहे. त्याची सूर्याभोवती प्रदक्षिणा सुमारे १६५ वर्षांत होते! म्हणजे हा सांपडल्यापासून ह्याची तिसरा हिस्सा प्रदक्षिणा पुरी झाली नाही. ३०० प्रभावाच्या दुर्बिणीतून मात्र ह्याचे बिंब ओळखितां येते. त्याचा दृश्य व्यास फक्त ३ विकला आहे. हा अतिदूर असल्यामुळे आंसाभोवती फिरण्यास ह्यास किती काळ लागतो तें समजले नाही. तसेच ह्याच्या शारीरघटनेविषयी दुर्बिणीतून काही समजत नाही. व वर्णलेखकयंत्रानेही अद्यापि कांहीं समजले नाही. ह्याला एक उपग्रह आहे. तो त्याभोवती सुमारे ५ दिवस २१ तासांत फिरतो. ह्या उपग्रहाची कक्षा प्रजापतीच्या चंद्रांपेक्षाही विलक्षण आहे. तिचा क्रांतिवृत्ताशी कोन सुमारे १४५ अंश आहे. म्हणजे त्याची गति पश्चिमेकड्न पूर्वेकडे नाही, उलटी आहे. ह्या उपग्रहावर वरुणाचे जे आकर्षण आहे त्यावरून वरुणाच्या द्रव्याचे मान सूक्ष्मपणे काढिले आहे. GERAL 1/571 GENER (सार्वजनिकला JATIVE