पान:ज्योतिर्विलास.pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ग्रहांचे उदयास्त म्हणजे दर्शनादर्शनें. १२१ ग्रह यांच्या नित्यातिशास्त्रकारांनी पाडल म्हणजे गु. सर्या भोवती बुधाच्या प्रदक्षिणा सुमारे ३५२ दिवसांत ४ होतात. इतक्या वेळांत पृथ्व ची सूर्याभोवती प्रदक्षिणा एकीहून किंचित् कमी होते. ३४८ दिवसांत पृथ्वीपेक्षां बुधाच्या प्रदक्षिणा ३ जास्त होतात. म्हणून ३४८ दिवसात बु. धाचे/एकदिगुदय किंवा एकदिगस्त तीन तीन होतात. म्हणून ३४८ दिवसात युः धाचे अस्त व उदय मिळून १२ होतात, म्हणजे ६ अस्त व६ उदय. सर्व ग्रहांची अस्तोदयकालांची मध्यम माने वर सांगितली आहेत, त्यांचीही उपपत्ति यावरून समजून येईल. ग्रहनक्षत्रे सूर्याजवळ असली म्हणजे त्यांचा अस्त किंवा उदय होतो असे वर सांगितले. आतां, ती किती जवळ आली म्हणजे अस्तोदय होतो याबद्दल काहा नियम असले पाहिजेत, हे उघड आहे. अमुक ग्रह सूर्याजवळ असतां दोहामध्य अमुक अंतरापेक्षा कमी अंतर झाले म्हणजे त्या ग्रहाचा अस्त होतो व जास्त अतर झाले म्हणजे उदय होतो, असे नियम असले पाहिजेत. हे नियम मुख्यतः ग्रहनक्षत्रांच्या तेजस्वीपणास अनुलक्षून असले पाहिजेत. असे नियम आहेत वता व दुसऱ्या काही गोष्टींवर अवलंबून आहेत. ग्रहाचा पूर्वेस उदयास्त व्हावया असतां सये व तो ग्रह यांच्या नित्योदयकालांत अमक अंतरापेक्षा कमी अतर शार म्हणजे त्याचा अस्त होतो व जास्त झाले म्हणजे उदय होतो; तसंच पाश्चमस उ यास्त व्हावयाचा असतां सर्य व ग्रह यांच्या नित्यास्तांत अमुक अतर झाला उदयास्त होतो; असे नियम आमच्या प्राचीन ज्योतिःशास्त्रकारांनी सागितल जाहत. उदाहरणार्थे, गरु व सर्य यांच्या नित्योदयास्तांत ११० पळे अंतर पडले म्हणज रूचा उदयास्त होतो असे सांगितले आहे. ग्रहादिकांच्या दैनंदिन भ्रमणात पळांत ते एक अंश ऋमितात. तेव्हां ११० पळांस ११ अंश झाले. ह अश कालसंबंधे आहेत म्हणन यांस कालांश म्हणतात. रविगुरूंमध्ये ११ कालाश तर झाले म्हणजे गुरूचा अस्तोदय होतो. आमच्या निरनिराळ्या ग्रंथांत ग्रहांच्या अस्तोदयाचे कालांश निरनिराळे आहेत. सांप्रतच्या पंचांगांत ग्रहलाघवांतले कालांश घेतात. अस्तोदयाचा अनुभव पाहन त्यावरून कालांश कायम करून ते पंचांग करतांना घतले पाहिजत. मा स्वतः पांच सहा वर्षे कांहीं अस्तोदयांचा अनुभव घेतला. व आमच्या सायनपचागाच्या मंडळीपैकी एक गृहस्थ रा०रा० गोपाळ बल्लाळ भिडे यांनी या कामी फार प्रयत्न केला. भिडे हे सन १८९१ साली स्वर्गवासी झाले. ते दीर्घायु होते तर आमच्या ज्योतिःशास्त्रज्ञानवृद्धीस त्यांचा पुष्कळ उपयोग झाला असता.. असो; आमच्या सर्व अनुभवांचे एकीकरण होऊन त्यावरून अस्तोदयाचे नियम निश्चित करण्याचे काम अजून पूर्ण झाले नाही. शनीचा अनुभव घेण्याला मला अद्यापि संधि मिळाली नाही. मंगळाचाही एक दोन वेळां मात्र अनुभव घेण्यास सांपडला. या कामी पर्जन्यादिक किती अडचणी असतात हे स्वानुभवाशिवाय समजणार नाही. काही अनुभवावरून आह्मी सायन पंचांगांत कालांश घेतो ते असे: